America : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत (Russia Ukraine War) भारताच्या (India) भूमिकेबाबत अमेरिकेचे (America) धोरण आता बदलत आहे. भारत आणि रशिया (Russia) यांच्यातील मैत्री आजची नाही हे अमेरिकेला चांगलेच माहीत आहे. त्याचा इतिहास अनेक दशकांचा आहे. दोन्ही देशांच्या मैत्रीवर अमेरिकेने म्हटले आहे, की भारत आणि रशियाचे संबंध अनेक दशके जुने आहेत. त्यामुळे भारताला आपल्या परराष्ट्र धोरणातील रशियाचे महत्व कमी करण्यास वेळ लागेल. अमेरिकेने भारताशीही घनिष्ठ संबंध असल्याचे सांगितले. आम्ही क्वाडमध्येही एकत्र काम करत आहोत आणि अनेक जागतिक मंचांवर एकत्र उभे आहोत.
अमेरिकेने म्हटले आहे की ते क्वाड आणि इतर मंचांद्वारे भारतासोबत काम करत आहे. रशिया-भारत संबंधांबाबत अमेरिकेने कालांतराने आपल्या भूमिकेत मोठे बदल केले आहेत. रशियाशी जुने संबंध असलेल्या देशांना पुन्हा परराष्ट्र धोरण बदलण्यास बराच वेळ लागेल, असे अमेरिकेने म्हटले आहे.
किंबहुना, रशिया आणि युक्रेनमधील (Ukraine) पाच महिन्यांहून अधिक काळ युद्ध (War) सुरू असताना रशियाने भारताच्याबाबतीत घेतलेले धोरण अमेरिकेला त्रासदायक ठरले आहे. कारण रशियाला एकाकी पाडण्यासाठी अमेरिका आणि इतर युरोपीय देशांनी त्यावर आर्थिक निर्बंध लादले. मात्र भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल आयात (Oil Import) केले. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) बैठकीत रशियाच्या विरोधात मतदान केले नाही. अमेरिकेला या गोष्टी आवडल्या नाहीत. यासाठी अमेरिकेने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण भारताने आपल्या गरजा सांगून अमेरिकेला सडेतोड उत्तर दिले होते.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, ‘इतर कोणत्याही देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबत बोलणे हे माझे काम नाही.’ ते म्हणाले की, ‘भारताचे रशियासोबतचे संबंध खूप जुने आहेत. भारताला आपल्या परराष्ट्र धोरणातील रशियाचे महत्व कमी करण्यास काही वेळ लागणार आहे.
विशेष म्हणजे युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जेव्हा अमेरिका आणि इतर देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले होते. याच कारणामुळे भारताने स्वस्त तेलाचा रशियाशी करार करण्यात आला त्यामुळे अमेरिकी नेते चांगलेच संतप्त झाले होते. पण भारतने माघार घेतली नाही. अमेरिकेला सडेतोड उत्तर दिले. यानंतर हळूहळू रशिया भारताला तेल विकण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला. जुलै महिन्यातील आकडेवारी पाहिली तर भारताने रशियाकडून दररोज 8 लाख 77 हजार 400 बॅरल तेल खरेदी केले आहे.