दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी मान्य केले की अमेरिकेच्या (America) अपयशामुळेच भारत आणि रशिया या देशांतील मैत्री वाढत गेली. ते म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील सामरिक संबंध अधिक दृढ होत आहेत. भारताने रशियाबरोबर भागीदारी (Partnership) केली. कारण अमेरिकेने याआधी भारताकडे दुर्लक्ष केले होते. भारताने ज्या मागण्या केल्या होत्या त्या अमेरिकेने पूर्ण केल्या नाहीत.
ब्लिंकेन यांनी बुधवारी अमेरिकन खासदारांना सांगितले की, भारत-रशिया संबंध अनेक दशकांआधीचे आहेत. भारतासाठी, जेव्हा आम्ही भागीदार बनण्याच्या स्थितीत नव्हतो तेव्हा रशिया तिथे होता. आता आम्ही प्रयत्न करत आहोत. सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या सुनावणी दरम्यान एका सिनेटरच्या प्रश्नाला उत्तर देताना ब्लिंकेन म्हणाले, “निश्चितपणे चीनचा यात मोठा वाटा आहे.”
ब्लिंकेन म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय नेतृत्वाबरोबर थेट संवाद साधण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. “आम्ही क्वाडला प्रोत्साहन दिले, जे भारताला, जपान ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेबरोबर जोडते. भारताबरोबर विविध आघाड्यांवर सहकार्य मजबूत करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे, की या महिन्यात भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी अँटनी ब्लिंकेन यांची भेट घेतली आणि जागतिक परिस्थिती, प्रादेशिक समस्या आणि द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली. या ‘टू प्लस टू’ मंत्रिस्तरीय बैठकीत भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी युक्रेनसह सध्याच्या घडामोडींवर चर्चा केली, तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या आक्रमकतेबाबत परस्पर सहकार्याचा आढावा घेतला.
‘टू प्लस टू’ चर्चेला एस जयशंकर आणि राजनाथ सिंह यांच्यासह अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकेन आणि संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन उपस्थित होते. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय भागीदारीसाठी एकात्मिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणे हा या संवादाचा उद्देश आहे.
अमेरिका, नाटो आघाडीने रशिया हैराण..! केला ‘हा’ धक्कादायक आरोप; जाणून घ्या, युद्धाचे अपडेट..