America : रशियाला झटका! अमेरिकेकडून नव्या निर्बंधांची घोषणा, कारणही धक्कादायक

America Announce 500 New Sanctions Against Russia : अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव कायम (America Announce 500 New Sanctions Against Russia) आहे. आता अमेरिकेने रशियाच्या विरोधात आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी रशियाविरोधात आणखी पाचशेपेक्षा जास्त नव्या निर्बंधांची घोषणा केली. युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारणे (Ukraine War) आणि विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी यांचा तुरुंगातील मृत्यू हे या निर्बंधांमागचे कारण सांगितले जात आहे. बायडेन यांच्या म्हणण्यानुसार, या नियमानुसार नवलनींच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेले लोक आणि रशियन सैन्याला लक्ष्य करण्यात आले आहे.

दुसऱ्या देशाविरोधात आक्रमकता दाखवणे आणि दडपशाही करणे यांची किंमत चुकवावी लागते हेच अमेरिकेच्या या कृतीतून दिसून येत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचे कट्टर राजकीय विरोधक नवलनी यांचा काही दिवसांपूर्वी तुरुंगातच संशयास्पद रित्या मृत्यू झाला होता. त्यानंतर अमेरिकेने रशियाविरोधात हे निर्बंध लादले आहेत.

Ukraine Russia War | विनाशकारी युद्धाची दोन वर्षे; उद्धवस्त शहरे, हजारोंचा मृत्यू, अन् लाखो लोक बेघर

America Announce 500 New Sanctions Against Russia

अमेरिकेने सुमारे 100 रशियन कंपन्या आणि व्यक्तींवर कठोर निर्बंध लागू केले आहेत. इतकेच नाही तर युरोपियन युनियननेही सुमारे 200 रशियन कंपन्या आणि व्यक्तींवर निर्बंध जारी केले आहेत. अमेरिकेने निर्बंध लादल्यानंतर रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. रशियात प्रवेश करण्यास प्रतिबंधित युरोपियन युनियन अधिकारी आणि नेत्यांची यादी आणखी वाढविण्यात येत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

America Announce 500 New Sanctions Against Russia

युक्रेनवर सातत्याने होत असलेले हल्ले पाहता अमेरिका रशियावर काही कडक निर्बंध लादण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या याआधी आल्या होत्या. अर्थ विभागाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले होते की अमेरिका रशिया आणि त्याच्या समर्थकांवर जोरदार प्रहार करणार आहे. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी हा निर्णय जाहीर केला. रशियावर आधीचेही अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे रशियाच्या अडचणी वाढल्या होत्या. यात आता आणखी नव्या निर्बंधांची भर पडली आहे.

Russia Ukraine War : ‘युक्रेन’नंतर पुतिन यांचा नवा प्लॅन! आता ‘या’ देशावर कब्जा करण्याची तयारी?

America Announce 500 New Sanctions Against Russia

विनाशकारी युद्धाची दोन वर्षे पूर्ण 

रशिया आणि युक्रेन यांच्यातील विनाशकारी युद्धाला (Ukraine Russia War) आज दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्षांच्या काळात दोन्ही देशांत अतोनात नुकसान झाले. लाखो लोक विस्थापित झाले. हजारो लोक मृत्यूमुखी पडले. शाळा, दवाखान्यांसह अन्य पायाभूत सुविधा उद्धवस्त झाल्या. हे युद्ध इतक्या दिवस सुरू राहिल याचा अंदाज कुणालाच नव्हता. दुसऱ्या महायुद्धानंतरचे (Ukraine War) हे सर्वात मोठे युद्ध ठरले आहे. या युद्धात रशियाच्या (Russia) तुलनेत युक्रेनचे जास्त (Ukraine) नुकसान झाले आहे.

America Announce 500 New Sanctions Against Russia

रशिया आणि युक्रेन यांच्या सीमा एकमेकाला लागून आहेत. त्यामुळे युक्रेनला रशियाकडून नेहमीच धोका वाटत होता. याच कारणामुळे युक्रेनला नाटो संघटनेत (NATO) सहभागी व्हायचे होते. परंतु, रशियाचा याला तीव्र विरोध होता. यासाठीच युक्रेनने काही निर्णय घेण्याआधीच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या आदेशानंतर रशियन सैन्याने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनवर हल्ले करण्यास सुरुवात केली.

Leave a Comment