Amazon Sale । खरेदीची सुवर्णसंधी! ‘या’ फोनवर मिळतेय सर्वात मोठी सूट, पहा धमाकेदार ऑफर

Amazon Sale । सध्या Amazon वर सेल सुरु असून या सेलमध्ये तुम्हाला सर्वात मोठ्या सवलतीत फोन खरेदी करता येतील. अशी संधी काही दिवसांसाठीच असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्या.

या फोन्सवर मिळतेय डिस्काउंट

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलचे टीझर पेज प्लॅटफॉर्मवर लाइव्ह झाले असून त्यावरून असे समजते की कोणत्या डिव्हाइसेसवर या सेलमध्ये सर्वात जास्त सूट मिळू शकते. अनेक OnePlus स्मार्टफोन्सना सेल दरम्यान मोठी सूट मिळणार असून त्यांच्या यादीमध्ये OnePlus Nord CE 4 Lite, OnePlus Nord 4, OnePlus Nord CE 4, OnePlus 12R आणि OnePlus 12 यांचा समावेश असणार आहे.

iQOO आणि Samsung वर मिळेल डिस्काउंट

सेलमध्ये Vivo संबंधित ब्रँड iQOO चे अनेक फोन स्वस्तात खरेदी करता येतील. हे फोन iQOO Z9 Lite 5G, iQOO 12 5G, iQOO Neo 9 Pro, iQOO Z7 Pro, iQOO Z9 आणि iQOO Z9x सेलमध्ये सवलतीत खरेदी करता येतील. जर तुम्हाला दक्षिण कोरियाई ब्रँड सॅमसंगचे फोन खरेदी करायचे असल्यास तर तुम्हाला Galaxy M15 आणि Galaxy A35 सारख्या अनेक मॉडेल्सवर सवलत मिळेल.

सेल दरम्यान Redmi 12 5G, Redmi 13 5G, Redmi Note 13 Pro, Note 13 Pro+ आणि Xiaomi 14 फोन सवलतीत मिळतील. याशिवाय Poco M6 Pro आणि Poco C65 वरही विशेष सवलत मिळेल. ग्राहकांना Oppo F27 Pro+, Tecno Pova 6 Pro, Tecno Spark 20 Pro आणि Realme Narzo 70 Pro वरही मोठ्या प्रमाणात सवलत मिळेल.

तसेच अनेक स्मार्टफोन्सवर ग्राहकांना 10,000 रुपयांपर्यंतच्या कूपन डिस्काउंटचा लाभ मिळेल. जुना फोन एक्सचेंज केला तर जुन्या फोनचे मॉडेल आणि स्थितीनुसार 50,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. इतर प्रमोशनल सवलती सेलमध्ये उपलब्ध असू शकतात आणि पुढील काही दिवसात विक्रीची किंमत उघड केली जाईल.

Leave a Comment