Amazon Prime Video : जर तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता अमेझॉन प्राइम व्हिडिओ संपूर्ण वर्षभर मोफत पाहू शकता. एका लोकप्रिय टेलिकॉम कंपनीने ही शानदार ऑफर आणली आहे.
रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना दोन वार्षिक योजनांसह संपूर्ण वर्षासाठी Amazon प्राइम सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे. हे मोबाईल प्लॅनचे सदस्यत्व असून त्यामुळे वापरकर्ते स्मार्टफोन किंवा टॅब्लेट सारख्या उपकरणांवर व्हिडिओ सामग्री प्रवाहित करता येईल. स्वतंत्र वर्षभर सदस्यता खरेदी करण्यापेक्षा हे खूप फायदेशीर आहे.
कंपनीचा वार्षिक 3,227 रुपयांचा प्लॅन
जिओ वापरकर्त्यांना या प्लॅनच्या रिचार्जिंगवर दररोज 2GB डेटा मिळत असून हा शानदार प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. वापरकर्ते सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल करता येईल. यात दररोज 100 एसएमएस पाठवण्याचा पर्याय मिळेल. प्राइम व्हिडीओ मोबाइल एडिशन व्यतिरिक्त इतर फायद्यांबद्दल सांगायचे झाल्यास हा रिचार्ज केल्यावर तुम्हाला JioTV, JioCinema आणि JioCloud ॲप्सचाही प्रवेश सहज मिळेल.
कंपनीचा वार्षिक 4,498 रुपयांचा प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये केवळ Amazon Prime Mobileच नाही तर एकूण 14 OTT सेवांचा लाभ मिळेल. 365 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 SMS उपलब्ध करून दिले आहेत. तसेच या प्लॅनमध्ये रिचार्जिंगवर 78GB अतिरिक्त डेटा मिळत आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध असणाऱ्या सेवांच्या सूचीमध्ये Disney+ Hotstar ते SonyLIV आणि ZEE5 इत्यादींचा समावेश आहे.
दोन्ही प्लॅनमधून रिचार्ज केला तर पात्र वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा देण्यात येत आहे. यासाठी वापरकर्त्याकडे Jio ची 5G सेवा असायला हवी आणि त्याच्याकडे 5G स्मार्टफोन पाहिजे.