Amazon offer : शानदार ऑफर! स्वस्तात मिळतोय 32MP सेल्फी कॅमेरा असलेला Samsung फोन, होईल हजारोंची बचत

Amazon offer : जर तुम्ही स्वस्तात नवीन फोन खरेदी करू इच्छित असाल तर Amazon ने तुमच्यासाठी एक शानदार सेल आणली आहे. या सेलमधून तुम्हाला Samsung Galaxy A55 5G हा फोन मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात खरेदी करता येईल.

कंपनी या फोनवर 2150 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देत असून आता आकर्षक EMI स्कीममध्ये हा फोन तुमचा असेल. हे लक्षात घ्या की एक्सचेंज ऑफरमध्ये फोनची किंमत 39,350 रुपयांनी कमी करता येईल. हे लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असणार आहे.

Samsung Galaxy A55 5G चे फीचर्स

कंपनी Samsung Galaxy A55 5G या फोनमध्ये 2340×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देत असून हा सुपर AMOLED Infinity-O HDR डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तर डिस्प्ले संरक्षणासाठी कंपनी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ देत आहे. फोन 12 GB रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात येईल. प्रोसेसर म्हणून तुम्हाला Exynos 1480 चिपसेट पाहायला मिळेल.

इतकेच नाही तर फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये 50-मेगापिक्सलच्या मुख्य लेन्ससह 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 5-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरचा समावेश करण्यात आला आहे. तर या फोनचा मुख्य कॅमेरा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरसह येतो.

सेल्फीसाठी तुम्हाला या सॅमसंग फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पाहायला मिळेल. कंपनी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह 5000mAh बॅटरी देत ​​असून ही बॅटरी 25 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीचा हा जबरदस्त फोन Android 14 वर आधारित OneUI 6.1 वर काम करतो.

Leave a Comment