Alto-K10 Discount: भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी मे महिन्यात ग्राहकांना सर्वात स्वस्त कार Alto K10 वर बंपर डिस्काउंट देत आहे.
यासोबतच कंपनीच्या इतर काही लोकप्रिय मॉडेल्सवरही काही डिस्काउंट ऑफर दिल्या जात आहेत. मारुती अल्टो ही सध्या देशात उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त कार आहे आणि हे मॉडेल सर्वाधिक सवलत देत आहे. याशिवाय मारुती सुझुकी डिझायर आणि मारुती सुझुकी वॅगनआरच्या खरेदीवरही ग्राहकांना सूट देण्यात येत आहे.
Alto K-10 वर Rs 59,000 पर्यंत सूट
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी ग्राहकांना मे 2023 मध्ये सर्वात स्वस्त हॅचबॅक कार Alto K10 च्या खरेदीवर 59,000 रुपयांची सूट देत आहे.
या ऑफरमध्ये 40,000 रुपयांची ग्राहक सूट, 15,000 रुपयांची एक्सचेंज सूट आणि 4,000 रुपयांची विशेष कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.
Alto K10 किंमत
Alto K10 ची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे. याच बरोबर Alto 800 ची देखील विक्री होत आहे. स्टॉक संपेपर्यंत ही विक्री होणार आहे.
कारण नवीन BS6 फेज 2 नियमांमुळे मारुतीने Alto 800 चे उत्पादन थांबवले आहे. आता कंपनी फक्त उरलेला स्टॉक संपेपर्यंत विकत आहे.
Maruti Suzuki Car Discount Offer
मारुती सुझुकी आपल्या ग्राहकांना या महिन्यात आणखी एका हॅचबॅक S-Presso च्या खरेदीवर 30 ते 35 हजार रुपयांची सूट देत आहे.
त्याच वेळी, कंपनी आपल्या WagonR च्या खरेदीवर या महिन्यात 30,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. तर मारुती सुझुकी डिझायरवर 30 ते 35 हजार रुपयांची सूट मिळत आहे.