मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे.. राज्यातील अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी नि बडे नेते ‘ईडी’च्या रडारवर आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटी रुपये वसुलीप्रकरणात जेलमध्ये आहेत. त्यांच्यानंतर ‘ईडी’ने मंत्री नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली.. परिवहन मंत्री अनिल परब यांनाही काही दिवसांपूर्वी ‘ईडी’ची नोटीस आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांच्या घरीही ‘ईडी’ने छापेमारी केली होती. या सगळ्या घटना वारंवार समोर येत असतानाच, महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू आता कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे.. विधानसभेमध्ये सर्वसामान्य, कष्टकऱ्यांची बाजू मांडणारे लोकप्रतिनिधी म्हणून बच्चू कडू यांना ओळखले जाते.. मात्र, आता त्यांच्याविरुद्ध तपास करुन गुन्हे दाखल करण्याचे आदेश अकोला जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीने कडू यांच्यावर अकोला जिल्ह्यातील तीन रस्त्यांच्या कामांत 1 कोटी 95 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.. वंचित बहुजन आघाडीने जानेवारी-2022 मध्ये बच्चू कडू यांच्याविरुद्ध अकोला पोलिसांत तक्रार केली होती, पण पोलिसांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्हा न्यायालयात धाव घेतली. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही कडू यांची तक्रार केली. राज्यपालांनी ही तक्रार ऐकून योग्य त्या कारवाईचा आदेश दिला होता.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने कडू यांच्याविरोधात न्यायालयात पुरावे सादर केले. त्यानंतर आता अकोला जिल्हा न्यायालयाने 24 तासांत तपास करुन कडू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अकोल्याचे पालकमंत्री असणाऱ्या बच्चू कडू यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांचा निधी वळता करीत 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप ‘वंचित’नं केला होता. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शिफारस केलेली रस्त्यांची कामं पालकमंत्री कडू यांनी डावलली व आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामं नियमबाह्यपणे केल्याचा आरोप ‘वंचित’नं केला. त्यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे ‘वंचित’ने सादर केले होते. या तीन रस्त्यांच्या कामांत बच्चू कडू यांनी 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप ‘वंचित’नं केलाय. ‘वंचित’च्या तक्रारीनंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या तीन रस्त्यांसह 25 कामांना स्थगिती दिली होती.
मध्य प्रदेश आणि दिल्लीनंतर आता ‘या’ राज्यात बुलडोझर भीती; प्रशासन म्हणतो,आम्ही..
आटपा लवकर.. नाहीतर रेशन होईल बंद..! पहा नेमके काय करावे लागणार आहे ते