दिल्ली – समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Samajwadi Party Chief Akhilesh Yadav) यांनी म्हटले आहे की, निवडणुकीनंतर दैनंदिन वापरातील प्रत्येक वस्तू खर्चिक झाल्याने सर्वसामान्यांच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. देशातील आणि राज्यातील या परिस्थितीने भाजप सरकारचे (BJP Govt) गरीब आणि शेतकरी हिताचे खोटे दावे उघड केले आहेत.

सपाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात अखिलेश यांचा हवाला देत म्हटले आहे, की निवडणुकीआधी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, गरीबांना अन्न यांसारख्या मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गव्हाचा (Wheat) कोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जून महिन्यापासून गरिबांना गव्हाऐवजी तांदूळ वाटण्यात येणार आहे. आतापर्यंत तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ वाटण्याचे सांगण्यात येत होते.

भाजपने गहू खरेदीमध्ये शेतकऱ्यांच्या हितापेक्षा उद्योगपतींच्या हिताला प्राधान्य दिले. गव्हाच्या शासकीय खरेदीऐवजी पाच बड्या कंपन्यांना गहू विकण्यात आला. उत्तर प्रदेशात गहू खरेदीचे उद्दिष्ट 60 लाख मेट्रिक टन (Wheat Purchase target In Uttar Pradesh) असताना केवळ 2.35 लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात आला. खरेदी केंद्रावर कमी खरेदीबरोबरच गव्हाचे उत्पादनही घटल्याचे वृत्त आहे. त्यामुळे बाजारात पीठ अधिक खर्चिक होणार आहे. त्यामुळे बडे उद्योगपती आणि त्यांच्या कंपन्यांचा नफा वाढेल.

शेतकऱ्यांचे हित साधण्याचा भारतीय जनता पार्टीचा हेतू कधीच नव्हता, असा आरोप सपा प्रमुखांनी केला. सरकारला जर शेतकऱ्यांना गव्हाची किफायतशीर किंमत द्यायची असेल, तर किमान आधारभूत किंमत (MSP) किमान 2500 रुपये प्रति क्विंटल असायला हवी होती. शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची छळवणूक होत आहे. भाजप गरिबांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी किंवा गरीब लोक हे भारतीय जनता पार्टीच्या आर्थिक अजेंड्यात नाहीत. भाजप तर सुरूवातीपासूनच शेतकरी विरोधी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

उत्तर प्रदेश निवडणूक : नोकरी सोडून राजकीय क्षेत्रात उतरला ` ईडी`चा वरिष्ठ अधिकारी..

अखिलेश यादव यांची मोठी घोषणा..! भाजपला दिलेय ‘हे’ आव्हान; पहा, काय आहे विरोधकांचा प्लान..

Share.

Leave A Reply

Exit mobile version