आठव्या षटकात 45 धावांवर पाकिस्तानला दुसरा धक्का बसला. लेगस्पिनर आदिल रशीदने पाकिस्तानचा इनफॉर्म बॅट्समन मोहम्मद हरिसला बेन स्टोक्सच्या हाती झेलबाद केले. हरिसला 12 चेंडूत आठ धावा करता आल्या. तत्पूर्वी, मोहम्मद रिझवानही 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. सध्या कर्णधार बाबर आझम 20 चेंडूत 21 धावा आणि शान मसूद एक धाव घेऊन फलंदाजी करत आहे. आठ षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या दोन बाद 50 अशी आहे.
PAK Vs ENG T20 Live Score: 50/2 (8.0 ov)
बल्लेबाज | R | B | 4s | 6s | SR |
मोहम्मद रिजवान b Sam Curran | 15 | 14 | 0 | 1 | 107.14 |
बाबर आजम Batting | 22 | 20 | 1 | 0 | 110.00 |
Mohammad Haris c Ben Stokes b Adil Rashid | 8 | 12 | 1 | 0 | 66.67 |
शान मसूद* Batting | 1 | 3 | 0 | 0 | 33.33 |
सहा षटकांनंतर पाकिस्तानने एका विकेटच्या मोबदल्यात 39 धावा केल्या. कर्णधार बाबर आझम 16 चेंडूत 16 धावा आणि मोहम्मद हारिस सात चेंडूत चार धावा करत फलंदाजी करत आहे. मोहम्मद रिझवान पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. त्याने 14 चेंडूत 15 धावा केल्या. रिझवानला सॅम करणने बोल्ड केले.
पाकिस्तानने 5.0 षटकात 1 गडी गमावून 29 धावा केल्या आहेत. सध्या मोहम्मद हारिस 0 धावांवर तर बाबर आझम 11 धावांवर खेळत आहे. पाकिस्तानने पाचव्या षटकात 29 धावांवर पहिली विकेट गमावली. सॅम कुरनने मोहम्मद रिझवानला बोल्ड केले. चेंडू रिझवानच्या बॅटला लागून विकेटला लागला. रिझवानला 14 चेंडूत 15 धावा करता आल्या. सध्या मोहम्मद हरिस आणि बाबर आझम क्रीजवर आहेत. पाच षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या एका विकेटवर 29 धावा आहे.
मुंबई : T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आज पाकिस्तान आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने खेळत आहेत. मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना खेळला जात असून दोन्ही संघांनी यापूर्वी प्रत्येकी एकदा विश्वचषक जिंकला आहे. 2009 मध्ये पाकिस्तान आणि 2010 मध्ये इंग्लंड T20 चॅम्पियन बनले होते. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. जगभरात याची उत्सुकता आहे.
इंग्लंड: जोस बटलर (w/c), अॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरान, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद.
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी.
पाकिस्तानकडून सलामीसाठी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान मैदानात उतरले आहेत. त्याचवेळी पहिल्याच षटकात बेन स्टोक्सने गोलंदाजी केली. त्याने पहिला चेंडू नो बॉल टाकला. यानंतर त्याने वाईड बॉल टाकला. फ्री हिटवर रिझवानला एकही धाव करता आली नाही. यानंतर जॉर्डननेही रिझवानला धावबाद करण्याची संधी गमावली. जॉर्डनच्या थ्रोवर चेंडू स्टंपच्या पुढे गेला. तोपर्यंत रिझवान क्रीजजवळही नव्हता. एक षटक संपल्यानंतर पाकिस्तानने एकही विकेट न गमावता आठ धावा केल्या आहेत.
तीन षटकांनंतर पाकिस्तानने एकही विकेट न गमावता 16 धावा केल्या आहेत. बाबर आझम 10 चेंडूत सहा धावा आणि मोहम्मद रिझवान नऊ चेंडूत सात धावा करत फलंदाजी करत आहे. पहिल्याच षटकात ख्रिस जॉर्डनने रिझवानला धावबाद करण्याची संधी गमावली.