Ajit Pawar : अजितदादांना धक्का! ‘घड्याळ’ वापरता येणार पण ‘या’ अटी पाळाव्याच लागणार, सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं?

Ajit Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Ajit Pawar) लोकसभा निवडणुकीची घोषणा (Lok Sabha Election) केली आहे. देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्र राज्यात पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. राज्यातील महायुतीत जागावाटपाबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. अजित पवार गटाकडून या निवडणुकांसाठी जोरदार तयारी केली जात असतानाच झटका देणारी बातमी आली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) अजित पवारांना झटका दिला आहे. शरद पवार गटाने घड्याळ चिन्ह गोठवण्याची केलेली मागणी कोर्टाने अमान्य केली. मात्र या निवडणुकीत घड्याळ चिन्हाचा वापर न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटीशर्तीनुसार करण्याचे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत.

निवडणुकीत प्रचार करताना अजित पवार गटाने सर्व ठिकाणी घड्याळ चिन्ह आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या अटी आणि शर्तीनुसार मिळाले आहे. खरी राष्ट्रवादी कुणाची यावर निर्णय आल्यानंतर याचा अंतिम फैसला होईल असे स्पष्टीकरण नमूद करावे अशा सूचना न्यायालयाने अजित पवार गटाला दिल्या आहेत. न्यायालयाच्या या निर्देशांमुळे निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी मात्र वाढणार आहेत.

Yugendra Pawar । कोण आहेत युगेंद्र पवार? ज्यांनी निवडणुकीपूर्वी अजित पवारांना दिला मोठा धक्का

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर विधीमंडळातील संख्याबळाच्या आधारावर पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवारांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. अजित पवारांचा गटच मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे असेही आयोगाने म्हटले होते. आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यानंतर शरद पवार गटाला तुतारी चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नाव निवडणुकीपर्यंत वापरण्याची परवानगी देण्यात आली होती.

या निर्णयाविरुद्ध शरद पवार गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान अजित पवार यांच्या पक्षाचे घड्याळ चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवार गटाने केली होती. मात्र त्यांची ही मागणी न्यायालयाने अमान्य केली. या प्रकरणी अंतिम निकाल येईल त्यानुसार अजित पवारांना घड्याळ चिन्हाचा वापर करता येईल असे निर्देश न्यायालयाने दिले.

Lok Sabha Election 2024 : राज्यात पुन्हा कमळ ? ठाकरे; पवारांना धक्का, जाणून घ्या ताजे सर्वेक्षण

Leave a Comment