Ajit Pawar News : मागच्या काही दिवसापासून राज्यात सुरू असणाऱ्या राजकीय घडामोडीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2 मे रोजी दिलेल्या अध्यक्षपदाच्या राजीनामा शुक्रवारी मागे घेतला यामुळे तेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणार आहे. अशी माहिती त्यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन दिली.
मात्र या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार उपस्थित पुन्हा एकदा अनेक चर्चा झाली होती मात्र आता अजित पवार यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एक अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून शरद पवार यांच्या पक्षप्रमुखपदी कायम राहण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहण्याचा पवार साहेबांचा निर्णय कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा आणि महाविकास आघाडीची ताकद आहे, असे अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाला राज्यात आणि देशात मोठे यश मिळेल. शरद पवार यांच्या वयाची आणि तब्येतीची काळजी घेण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी, असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला अजित पवार अनुपस्थित होते
यासोबतच पुढील आठवड्यात होणाऱ्या आपल्या दौऱ्याची माहिती दिली. उद्यापासून ते आठ दिवस पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर, नाशिकचा दौरा करणार आहेत.
शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्याच्या समितीच्या निर्णयानंतर समितीच्या सर्व सदस्यांनी त्यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर वाय.बी. चव्हाण सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या गैरहजेरीने या संपूर्ण प्रकरणावरून पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीचा मुद्दा उपस्थित झाला. अशा स्थितीत अजित पवार यांनी अधिकृत निवेदन जारी करून या निर्णयाचे स्वागत करून सध्याचे संशयाचे ढग दूर केले आहेत.