Ajit Pawar : मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असती तर…, अजिदादांचा शिंदे- फडणवीसांसमोर मोठा खुलासा

Ajit Pawar : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘योद्धा कर्मयोगी – एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी बोलताना अजित पवारांनी मोठा खुलासा केला आहे. जर तुम्ही मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असती तर मी संपूर्ण पक्ष सोबत आणला असता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यापेक्षा राजकारणात मी ज्येष्ठ आहे. फडणवीस 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले तर शिंदे 2014 मध्ये सर्वजण पुढे गेले आणि मी मागे राहिलो असं विनोदी शैलित अजित पवार म्हणाले. आयुष्यात जे घडते तेच नशिबात लिहिलेले असते. अजित पवारांच्या या वक्तव्यावर उपस्थित लोक देखील हसले.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, त्याच विधानसभेच्या कार्यकाळात (2019 ते 2024 दरम्यान) ते मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि नंतर उपमुख्यमंत्री झाले आणि त्याचप्रमाणे अजित पवार उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि नंतर उपमुख्यमंत्री झाले.  त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या दोन वर्षात विकास आणि कल्याणकारी योजनांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतरही आपले सरकार सत्तेत राहील, असा विश्वास व्यक्त केला.

जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी आपल्यासबोत 40 आमदारांना घेऊन भाजप – शिंदे गट सरकारमध्ये सामील झाले होते.

Leave a Comment