Ajit Pawar । विधानसभेत राष्ट्रवादी किती जागांवर लढणार? थेट अजित पवारांनीच सांगितला आकडा

Ajit Pawar । लोकसभेनंतर आता अवघ्या काही महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभेत महाराष्ट्रात महायुतीला महाविकास आघाडीकडून पराभव सहन करावा लागला होता. पराभवामुळे आता महायुती आगामी निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच तयारीला लागली आहे.

महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी उमेदवारांची चाचपणी, बैठका तसेच मेळावे देखील सुरु केले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी 80 जागा लढवणार असल्याचे सांगितले होते.

अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देत पक्ष किती जागांवर उमेदवार उभे करणार? याची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस 85 जागांवर उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु केली असून महायुतीमधील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार असल्याचे अजित पवारांनी आमदारांना सांगितले.

पुढे अजित पवार म्हणाले की, “लवकरच विधानसभा निवडणुकीचे जागावाटप होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 85 जागा विधानसभा घेणार आहे, असा दावा अजित पवार यांनी बैठकीत केला आहे. या बैठकीत अजित पवार यांनी थेट निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. आमदारांनी काय करावे आणि काय करु नये? याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

“मित्र पक्ष सोबत वादग्रस्त विधान टाळा, असे सर्व आमदार आणि पक्षाचे प्रवक्ते यांना बैठकीत सांगितले आहे. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवा. लाडली बहीण, बसमध्ये महिला अर्ध्या दारात तिकीट तसेच इतर लोक कल्याणकारी योजना जनतेसाठी महायुतीच्या सरकारने सुरु केल्या आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार जनतेमध्ये करावा,” असेही आदेश अजित पवारांनी दिले आहेत.

Leave a Comment