Ajit Pawar । विधानसभेच्या तोंडावर अजितदादांचा मोठा डाव! ‘या’ पक्षांना घेणार सोबत

Ajit Pawar । राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. सर्व राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला चांगला फायदा झाला. तर महाविकास आघाडीला अपेक्षित असे यश मिळाले नाही.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीत खूश नाही असे पाहायला मिळत आहे. कारण सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी हालचाली करायला सुरुवात केली आहे.

या तिसऱ्या आघाडीमध्ये बच्चू कडू, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम सारख्या छोट्या पक्षांचा समावेश असण्याची शक्यता आहे. जर भविष्यात ही आघाडी स्थापन झाली तर राज्याच्या राजकारणाला मोठे वळण मिळू शकते, अशी शक्यता सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बरोबर असतानाही भाजपला मोठा फटका बसला. यानंतर अजित पवारांना बरोबर घेतले असल्याने राज्यात महायुतीचे नुकसान झाले अशी टीका अनेकांनी केली होती.

त्यामुळे आता लोकसभेत बसलेला फटका टाळण्यासाठी भाजपने अजित पवार यांच्यासमोर बंच्चू कडू, वंचित आघाडी आणि एमआयएमला बरोबर घेत तिसरी आघाडी स्थापन करण्याचा पर्याय दिला असल्याची माहिती आहे. जर ही आघाडी निर्माण झाली तर याचा महाविकास आघाडीला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा तिसरी आघाडी स्थापन करायला यशस्वी होतात का? हे पाहणे महत्त्वाचे असेल.

Leave a Comment