Ajit Pawar : विधानसभेपूर्वी अजितदादांच्या अडचणीत वाढ, ‘ते’ 8 नगरसेवक शरद पवार गटात जाणार?

Ajit Pawar : काही महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभेच्या निकालांनंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोमाने निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुकीत कोणाचा विजय होणार? कोणत्या पक्षाचे राज्यात सरकार येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमधून त्यांना धक्के बसायला सुरुवात झाली आहे. पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह तब्बल 16 नगरसेवकांनी शनिवारी मोदीबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अजित पवार गटात एकच खळबळ उडाली आहे. भेट घेतलेल्या या 8 नगरसेवकांची नावे देखील समोर आली आहेत.

  • अजित गव्हाणे – शहराध्यक्ष, अजित पवार गट
  • विक्रांत लांडे – माजी नगरसेवक ( माजी आमदार विलास लांडेंचे पुत्र)
  • पंकज भालेकर – माजी नगरसेवक
  • संजय वाबळे – माजी नगरसेवक
  • समीर मासुळकर – माजी नगरसेवक
  • राहुल भोसले – माजी नगरसेवक
  • वैशाली घोडेकर – माजी नगरसेविका
  • विनया तापकीर – माजी नगरसेविका

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिंपरी चिंचवड मधील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी हे शरद पवारांना भेटण्यापूर्वी अजित पवार यांना भेटले होते. महायुतीमध्ये एक बेसिक फॉर्म्युला ठरला आहे ज्यांचे विद्यमान आमदार असतील ती विधानसभा त्याच पक्षाच्या वाट्याला येणार आहे. यानुसार भोसरी विधानसभा ही भाजपला सुटणार आहे, हे स्पष्ट आहे. आता हे नगरसेवक शरद पवार गटात जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Comment