Ajit Agarkar : आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) तंदुरुस्त झाल्यानंतर संघात परतले आहेत, तर तिलक वर्माचा (Tilak Varma) वनडे संघात प्रथमच समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी युजवेंद्र चहल पुन्हा एकदा निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरला आहे. तथापि, आपल्या पहिल्या संघ निवड कार्यात अजित आगरकरने (Ajit Agarkar) तीन मोठ्या चुका केल्या आहेत, ज्याची किंमत रोहित अँड कंपनीला कदाचित चुकवावी लागू शकते.
तिलक वर्मा यांची निवड कितपत योग्य आहे?
आशिया चषक 2023 च्या संघात तिलक वर्माचे नाव खूप आश्चर्यकारक आहे. आतापर्यंत तिलकने भारताकडून एकही वनडे सामना खेळलेला नाही. अशा स्थितीत आशिया चषकासारख्या मोठ्या स्पर्धेत त्याला संधी देणे अनेक प्रश्न निर्माण करतो. त्याच्या जागी डावखुरा फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhavan) याच्या अनुभवाचा भारतीय संघाला खूप उपयोग होऊ शकला असता.
चहल-अश्विनकडे दुर्लक्ष
आशिया चषक 2023 मध्ये भारतीय संघाला श्रीलंकेत सर्व सामने खेळायचे आहेत आणि हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की श्रीलंकेतील खेळपट्टीवरून फिरकीपटूंना खूप मदत मिळते. रविचंद्रन अश्विन (R. Ashwin) आणि युझवेंद्र चहल यांच्याकडे तो अनुभव होता, ज्यामुळे ते फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरू शकले असते. मात्र, अजित आगरकरने चहल किंवा अश्विनचा संघात समावेश केला नाही.
राहुल संघात का अनफिट?
केएल राहुल आणि श्रेयस अय्यर संघात परतले आहेत. मात्र, राहुल अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. खुद्द अजित आगरकरनेच सांगितले आहे की राहुल अद्याप पूर्ण तंदुरुस्त नाही. तो स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत राहुल पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता, तर त्याला संघात का घेण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राहुलच्या जागी निवडकर्त्यांना इतर कोणत्याही फलंदाजाला आजमावता आले असते. मात्र तसे केलेले नाही. त्यामुळेच आगरकरचे हे काही निर्णय आश्चर्यकारकच वाटतात. आता हे निर्णय खरेच फायद्याचे ठरतील की नुकसानीचे याचे उत्तर भारतीय संघाने सामना खेळल्यानंतरच मिळतील.