Airtel : मुंबई : जर तुम्ही देखील एअरटेलचे ग्राहक असाल तर आज आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे 30 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लानबद्दल माहिती देणार आहोत. या यादीतील सर्वात स्वस्त प्लान 106 रुपयांचा आहे आणि या यादीतील सर्वात खर्चिक प्लान 296 रुपयांचा आहे. जर तुम्ही रिचार्ज करणार असाल तर पहिल्या 30 दिवसांच्या वैधतेसह या प्लान्सवर एक नजर टाका. आता आम्ही तुम्हाला या Airtel प्लान्ससह उपलब्ध असलेल्या फायद्यांविषयी तपशीलवार माहिती देत आहोत.
कंपनीच्या 109 रुपयांच्या या प्लानमध्ये फक्त 200MB डेटा दिला जातो. यासोबत तुम्हाला 99 रुपयांचा टॉकटाइम मिळेल. लोकल, एसटीडी कॉल करण्यासाठी प्रति सेकंद 2.5 पैसे आकारले जातील.
181 रुपयांच्या या प्लानसह कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल सुविधेसह दररोज 1 GB हाय-स्पीड डेटा दिला जात आहे. डेटा आणि कॉल व्यतिरिक्त, डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाइल एडिशन देखील या प्लानसह 3 महिन्यांसाठी दिले जात आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या प्लानमध्ये एसएमएस दिले जात नाहीत.
199 रुपयांच्या या प्लानमध्ये एकूण 3 GB हाय-स्पीड डेटा दिला जातो, सोबतच तुम्हाला या प्लानसोबत रिचार्ज केल्यावर अमर्यादित कॉल आणि एकूण 300 एसएमएस मिळतील. इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, या प्लानमध्ये तुम्हाला मोफत विंक म्युझिक आणि हेलोट्यूनचा लाभ मिळेल.
296 रुपयांच्या या प्लानमध्ये एकूण 25 GB डेटा कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि 100 SMS प्रतिदिन दिले जातात. इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर या पॅकसोबत अपोलो 24/7 मेंबरशिप, फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक, फ्री हॅलोट्यून आणि विंक म्युझिक दिले जात आहेत. त्यामुळे रिचार्ज करण्याआधी या प्लानबद्दल माहिती घ्या. अन्य कंपन्यांच्या प्लानमध्येही काय फायदे मिळतात याचा अभ्यास करून निर्णय घेतल्यास ते जास्त फायद्याचे ठरेल.
- वाचा : Jio-Airtel Speed : ‘त्यामध्ये’ जिओच ठरला बेस्ट.. पहा, Vodafone-BSNL मिळाला कितवा नंबर
- Airtel 5G Plus Service : एअरटेलने दिली खुशखबर.. पहा, तुम्हाला काय-काय मिळणार मोफत ?