Airtel Recharge Plan : एअरटेल (Airtel Recharge Plan) कंपनी आपल्या ग्राहकांना अनेक अमर्यादित रिचार्ज प्लॅन ऑफर करते. तथापि, जर तुम्ही जर एअरटेलचे सिमकार्ड वापरत असाल, तर तुमच्या फोनची गरज कमी असू शकते. विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी, कंपनी 155 रुपयांचा एंट्री लेव्हल प्लॅन ऑफर करते. या प्लॅनमध्ये काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ या..
एअरटेलचा 155 रुपयांचा प्लॅन हा एंट्री लेव्हल अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन (Airtel Prepaid Recharge Plan) आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड फ्री कॉल दिले जाते. ग्राहक लोकल, एसटीडी आणि रोमिंगमध्ये मोफत कॉल करू शकतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलसह ग्राहकांना 1GB हायस्पीड डेटा आणि 300SMS देखील मिळतात. एअरटेलचा हा 155 रुपयांचा प्लॅन 24 दिवसांच्या वैधतेसह (Validity) येतो.
ग्राहक एका दिवसात फक्त 100 SMS पाठवू शकतील. त्याच वेळी, 300SMS ची मर्यादा संपल्यानंतर, ग्राहकांना स्थानिक एसएमएससाठी 1 रुपये आणि STD एसएमएससाठी 1.50 रुपये द्यावे लागतील.
या फायद्यांव्यतिरिक्त, ग्राहकांना या प्लॅनमध्ये विंक म्युझिक आणि फ्री हेलोट्यून्स सारखे काही इतर फायदे देखील मिळतील. तथापि, हाय स्पीड डेटाच्या मर्यादेनंतर, ग्राहकांकडून 50p/MB शुल्क आकारले जाईल.
तुम्ही फीचर फोनऐवजी स्मार्टफोनवर रु. 155 चा प्लॅन वापरत असाल, तर तुम्ही अतिरिक्त डेटासाठी रु. 99 डेटा पॅक देखील वापरू शकता. हा प्लॅन एक दिवसाच्या व्हॅलिडिटीसह येतो.