Airtel Prepaid Plans : देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी Airtel ने अचानक एक मोठा निर्णय घेत ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने आता तिच्या दोन लोकप्रिय प्रीपेड प्लॅनच्या किंमती 40 रुपयांनी वाढवल्या आहेत.
प्रति वापरकर्ता महसूल वाढवण्यासाठी आणि गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. सध्या देशात कंपनीचे 37 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने 118 रुपये आणि 289 रुपयांच्या प्लॅनच्या किमती वाढवल्या आहे. 118 रुपयांचा प्लॅन 4G डेटा वापरकर्त्यांसाठी आहे. आता हा प्लॅन 129 रुपयांचा झाला आहे. त्यानुसार हा प्लॅन 11 रुपयांनी महाग झाला आहे. त्याचप्रमाणे 289 रुपयांचा प्लॅन 329 रुपयांचा झाला आहे. म्हणजे 40 रुपये महाग झाला आहे. या प्लॅनच्या किंमती Airtel वेबसाइटवर तसेच मोबाइल ॲपवर दिसत आहेत.
राज्यात पुन्हा कमळ ? ठाकरे – पवारांना धक्का, जाणून घ्या ताजे सर्वेक्षण
एअरटेलचा 129 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या 129 रुपयांच्या प्लॅनमध्ये 12 GB डेटा उपलब्ध आहे. आधी त्याची किंमत 118 रुपये होती, म्हणजेच आता हा प्लॅन 11 रुपयांनी महाग झाला आहे. हा डेटा पॅक मोठ्या प्रमाणात डेटा प्रदान करतो. या प्लॅनची वैधता एक्टिव्ह बेस प्रीपेड प्लॅन सारखीच आहे. या प्लॅनमध्ये इतर कोणतेही फायदे समाविष्ट नाहीत. 118 रुपयांवरून 129 रुपयांपर्यंतच्या किंमतीत बदल करून, या प्लॅनसह डेटा किंमत 9.83 रुपयांपासून 10.75 रुपयांपर्यंत वाढली आहे.
एअरटेलचा 329 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
एअरटेलच्या 329 रुपयांच्या प्लॅनची किंमत यापूर्वी 289 रुपये होती. म्हणजेच हा प्लान 40 रुपयांनी महाग झाला आहे. हा प्लान 35 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एकाच वेळी 4 GB बल्क डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 300 मेसेज मिळतात.
क्रेडिट स्कोअरबाबत ‘ही’ माहिती जाणून घ्याच, होईल बंपर फायदा
या प्लॅनमध्ये ग्राहकांना एअरटेल थँक्सचे मोफत फायदेही मिळतात. ज्यामध्ये अपोलो फ्री विंक म्युझिकचा समावेश आहे.