Airtel Plan : 100Mbps पर्यंत स्पीड असणारा कंपनीचा जबरदस्त प्लॅन, कमी किमतीत घ्या OTT चा आनंद

Airtel Plan : भारतीय टेलिकॉम कंपनी Airtel ही जिओला कडवी टक्कर देते. कंपनीच्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. ज्याचा ग्राहकांना खूप फायदा होतो. आताही कंपनीने आपला एक खास प्लॅन आणला आहे, ज्यात तुम्हाला 100Mbps पर्यंत स्पीड,350 हून अधिक टीव्ही चॅनेल आणि OTT मजा घेता येईल.

699 रुपयांचा एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन

कंपनीच्या या शानदार प्लॅनमध्ये तुम्हाला 40Mbps चा इंटरनेट स्पीड दिला जात आहे. तसेच या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी अनलिमिटेड डेटा दिला जाईल. कंपनीचा हा प्लान वाय-फाय आणि टीव्ही सोबत OTT फायदे देतो. इतकेच नाही तर कंपनी प्लॅनसोबत मोफत 4K Android बॉक्स देत असून हा प्लॅन 350 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेलसह येते.

हा प्लॅन Airtel Black, XStream Fiber आणि Disney+ Hotstar वर मोफत प्रवेश देते. नवीन वापरकर्त्यांना 6 किंवा 12 महिन्यांसाठी या योजनेचे सदस्यत्व घेता येईल. या योजनेसाठी, तुम्हाला भाड्यासह जीएसटी भरावा लागणार आहे. हे लक्षात घ्या की कंपनी नवीन जोडण्यांवरून 1,000 रुपये इन्स्टॉलेशन चार्जेस आकारत आहे.

999 रुपयांचा एक्सस्ट्रीम फायबर प्लॅन

तसेच कंपनीच्या या प्लॅनमध्ये वाय-फाय सोबत टीव्ही आणि ओटीटी फायदे मिळत आहेत. या प्लॅनमध्ये 100Mbps च्या स्पीडने इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला अमर्यादित डेटा वापरायला मिळेल. 699 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे हा प्लॅन मोफत 4K Android बॉक्ससह येईल. हे 350 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेलवर विनामूल्य प्रवेश देते.

कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Airtel Black सोबत Xstream Play आणि Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. तसेच नवीन वापरकर्त्यांना 6 किंवा 12 महिन्यांसाठी या योजनेचे सदस्यत्व घेता येईल. कंपनी सबस्क्रिप्शनसाठी भाड्यासोबत जीएसटी आकारत असून याशिवाय, इंस्टॉलेशनसाठी तुम्हाला 1,000 रुपये देखील द्यावे लागणार आहेत.

Leave a Comment