Airtel : टेलिकॉम कंपनी एअरटेल जबरदस्त प्रीपेड प्लान (Prepaid Plan) ऑफर करत आहे. कंपनीकडे विविध प्लान आहेत. 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्लान एक वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टार आणि प्राइम व्हिडिओ मोफत सबस्क्रिप्शन (Free Subscription) सोबत मोफत कॉल आणि दररोज 2GB डेटा देखील प्रदान करतात. कंपनी देत असलेल्या या प्लानबद्दल आधिक माहिती जाणून घेऊ या..
एअरटेलचा 499 रुपयांचा प्लान
एअरटेलचा हा प्लान 28 दिवसांचा आहे. यामध्ये तुम्हाला इंटरनेट (Internet) वापरण्यासाठी दररोज 2 जीबी डेटा मिळेल. या प्लानमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉल (Unlimited Call) देखील उपलब्ध असतील. दररोज 100 एसएमएस मिळतात. कंपनीचा हा प्लान अनेक उत्तम अतिरिक्त लाभांसह येतो. प्लानच्या सदस्यांना कंपनी एका वर्षासाठी Disney + Hotstar मोबाइलचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. याशिवाय या प्लानमध्ये तुम्हाला विंक म्युझिकचे (Wynk Music) फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळेल.
Grocery Market: Adani कंपनीने दिलाय सुखद धक्का; खाद्यतेलाच्या भावात 30 रुपये घट https://t.co/YqkWItO9Yt
— Krushirang (@krushirang) July 20, 2022
एअरटेलचा 359 रुपयांचा प्रीपेड प्लान
28 दिवसांच्या वैधतेसह (Validity) येणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला दररोज इंटरनेट वापरासाठी 2 GB डेटा मिळेल. प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल ऑफर करत आहे. दररोज 100 मोफत एसएमएस ऑफर करणाऱ्या या प्लानसोबत, कंपनी प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे मोफत सबस्क्रिप्शनही देत आहे. याशिवाय या प्लानमध्ये तुम्हाला एअरटेल एक्सस्ट्रीम मोबाइल पॅक आणि विंक म्युझिकचेही सबस्क्रिप्शन मिळते.
iPhone 14: अर्र.. Apple ने दिला मोठा धक्का! ‘ही’ खास गोष्ट iPhone 14 मध्ये मिळणार नाही; तुम्हालाही ऐकून बसेल धक्का https://t.co/uS5pEdIAml
— Krushirang (@krushirang) July 20, 2022
एअरटेलचा 319 रुपयांचा प्लान
कंपनीचा हा प्लान एका महिन्याच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल देखील मिळेल. इंटरनेट वापरण्यासाठी, या प्लानमध्ये कंपनी दररोज 2 GB नुसार एकूण 60 GB डेटा देत आहे. कंपनी या प्लानच्या सदस्यांना विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे.