मुंबई : टेलिकॉम कंपनीने एअरटेल यूजर्ससाठी नवीन प्रीपेड प्लान आणला आहे. कंपनीचा हा प्लान 199 रुपयांचा आहे. यामध्ये 30 दिवसांची वैधता दिली जात आहे. टेलिकॉम टॉकने सर्वप्रथम एअरटेलच्या या प्लानची माहिती दिली. एअरटेल पूर्वी देखील वापरकर्त्यांना 199 रुपयांचा प्लान ऑफर करत असे. जुन्या प्लानची 24 दिवसांची वैधता मिळायची, तर 199 रुपयांच्या नवीन प्रीपेड प्लानची 30 दिवसांची वैधता आहे. नवीन आणि जुन्या प्लानमध्ये ऑफर केलेल्या डेटामध्येही फरक आहे. आधीच्या 199 रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी 24 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1GB डेटा ऑफर करत होती, जी नंतर 1.5GB पर्यंत वाढविण्यात आली.
त्याच वेळी नवीन प्लानमध्ये तुम्हाला 30 दिवस इंटरनेट वापरण्यासाठी एकूण 3 GB डेटा मिळेल. डेटा मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला 1MB डेटासाठी 50 पैसे खर्च करावे लागतील. नवीन प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलचाही फायदा मिळेल. कंपनी या प्लानमध्ये एकूण 300 मोफत एसएमएस देत आहे. प्लानमध्ये ऑफर केलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये विनामूल्य HelloTunes आणि विंक म्युझिकची विनामूल्य सदस्यता समाविष्ट आहे.
कंपनी 296 रुपयांच्या प्लानमध्ये 30 दिवसांची वैधता देखील देत आहे. या प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलसह दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतील. इंटरनेट वापरण्यासाठी या प्लानमध्ये एकूण 25 जीबी डेटा दिला जात आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला 1MB डेटासाठी 50 पैसे खर्च करावे लागतील. FASTag च्या खरेदीवर कंपनी या प्लानच्या ग्राहकांना 100 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. याशिवाय तुम्हाला मोफत विंक म्युझिक आणि हॅलोट्यून्सचाही लाभ मिळेल.
- Must Read : Airtel 5G Plus Service : एअरटेलने दिली खुशखबर.. पहा, तुम्हाला काय-काय मिळणार मोफत ?
- जिओलाही टक्कर देणारा आहे की..! ‘हा’ प्लान देतोय जबरदस्त फायदे; रिचार्ज करण्याआधी चेक करा डिटेल..