मुंबई : मागील वर्षात नोव्हेंबरमध्ये बीएनसएनएल वगळता सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जच्या दरात भरमसाठ वाढ केली. त्यामुळे नेहमीच्या रिचार्जसाठीही लोकांना कितीतरी जास्त पैसे द्यावे लागत आहेत. या दरवाढीमुळे आता प्रीपेड आणि पोस्टपेड योजनांमध्येही फारसा फरक राहिलेला नाही. तिन्ही दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत पोस्टपेड योजना ऑफर करतात. Airtel आणि Vodafone Idea त्यांच्या 499 च्या पोस्टपेड प्लॅनमध्ये जी सुविधा देतात, त्या सुविधा Reliance Jio कडे फक्त 399 मध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे आज आपण या तिन्ही कंपन्यांच्या प्लानची माहिती घेऊ या..
Airtel Rs 499 पोस्टपेड प्लॅन
Airtel च्या 499 च्या महिन्याच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 75 GB डेटा दिला जातो. यामध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएस पाठविण्याची सुविधा देखील आहे. याशिवाय, विंक म्युझिक, फ्री हॅलोट्यून्स आणि एअरटेल सिक्योर सारख्या सबस्क्रिप्शन देखील Amazon Prime आणि Disney Plus Hotstar वर 1 वर्षासाठी उपलब्ध आहेत.
Vodafone-Idea 499 रुपयांचा पोस्टपेड प्लान
व्होडाफोन-आयडियाचा प्लॅनही जवळजवळ एअरटेलसारखाच आहे. यामध्ये दरमहा 75 जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएस पाठविण्याची सुविधा देखील आहे. याशिवाय हंगामा 2 म्युझिक (6 महिने) आणि Vi चित्रपट आणि टीव्हीचे सबस्क्रिप्शन Amazon Prime आणि Disney Plus Hotstar वर 1 वर्षासाठी उपलब्ध आहे.
Reliance Jio 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
Airtel आणि Vodafone Idea या कंपन्यांच्या प्लॅनच्या तुलनेत रिलायन्स जिओ 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन ऑफर करते. यामध्ये तुम्हाला एका महिन्यासाठी 75 GB डेटासह अमर्यादित कॉल आणि दररोज 100 SMS मिळतात. विशेष म्हणजे, Amazon Prime, Disney + Hotstar आणि Jio अॅप सबस्क्रिप्शन व्यतिरिक्त Netflix मेंबरशिप देखील मोफत उपलब्ध आहे.
Recharge Plans : दररोज मिळतोय 2.5 GB डेटा; पहा, महागाईच्या दिवसात कोणता प्लान आहे बेस्ट..