नवी दिल्ली : आपल्या 5G सेवेचा विस्तार करत भारती एअरटेलने सोमवारी 5G प्लस सेवा गुवाहाटी या नवीन शहरात सुरू केली. यापूर्वी कंपनीने नुकतीच गुरुग्राममध्ये हाय स्पीड इंटरनेट सेवा सुरू केली आहे. कंपनी हळूहळू इतर शहरांमध्येही थेट 5G प्लस सेवा सुरू करेल. गुवाहाटीसह एअरटेल 5G प्लस सेवा आता देशातील 13 शहरांमध्ये आणली गेली आहे. अलीकडेच रिलायन्स जिओने बंगळुरू आणि हैदराबाद या दोन नवीन शहरांमध्ये JIO TRUE 5G सेवा सुरू केली आहे.
Airtel ची 5G सेवा सध्या गुवाहाटीच्या GS रोड, गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (GMCH), दिसपूर कॉलेज, गणेशगुरी, श्री नगर, उलुबारी, प्राणी संग्रहालय रोड, लचित नगर, बेलटोला, भानगढ आणि इतर काही निवडक ठिकाणी सुरू केली जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे, की लवकरच हायस्पीड इंटरनेट सेवा संपूर्ण शहरात विस्तारित केली जाईल.
Airtel 5G Plus सेवा आता गुवाहाटीसह देशातील 13 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. या शहरांमध्ये एअरटेलने दिल्ली, मुंबई, पुणे, वाराणसी, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, सिलीगुडी, कोलकाता, पानिपत, नागपूर आणि गुरुग्राम येथे आपली 5G प्लस सेवा सुरू केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे, की एअरटेल ग्राहकांना 4G स्पीड पेक्षा सुमारे 20-30 पट जास्त इंटरनेट स्पीड मिळेल आणि ते कोणत्याही बफरिंगशिवाय हाय स्पीड इंटरनेट सेवेचा आनंद घेऊ शकतात. 5G प्लस सेवांसाठी नवीन सिम घेण्याची आवश्यकता नाही. नवीन सेवा जुन्या 4G सिमसह देखील वापरता येतील.
दोन नवीन शहरांच्या समावेशासह, JIO TRUE 5G सेवा आता देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये थेट आहे. या शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी नाथद्वारा, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद यांचा समावेश आहे.
- Must Read : Airtel : वाव.. ‘हे’ आहेत महिनाभर चालणारे स्वस्त प्लान; रिचार्ज करण्याआधी यादी करा चेक..
- Jio-Airtel Speed : ‘त्यामध्ये’ जिओच ठरला बेस्ट.. पहा, Vodafone-BSNL मिळाला कितवा नंबर