Airtel : देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलकडे (Airtel) अनेक चांगले प्लान्स आहेत. जर तुम्हाला वारंवार रिचार्ज (Recharge Plan) करण्याचा कंटाळा येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला Airtel च्या जास्त वैधता (Validity) प्रीपेड रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत. या रिचार्ज प्लानमध्ये एक वर्षाची वैधता मिळत आहे. एअरटेलच्या या दीर्घ वैधता रिचार्ज प्लानमध्ये इंटरनेट डेटा आणि अमर्यादित कॉलसह अनेक उत्तम फायदे मिळतात. या प्लान्समध्ये तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टार आणि विंक म्युझिक (Wynk Music) अॅप सबस्क्रिप्शन (Subscription) मिळत आहे. या रिचार्ज प्लान्सबद्दल सविस्तर जाणून घेऊ या..
3359 रुपयांचा रिचार्ज प्लान
एअरटेलच्या या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 365 दिवसांची वैधता मिळत आहे. प्लानमध्ये, इंटरनेट वापरासाठी तुम्हाला दररोज 2.5GB इंटरनेट डेटा मिळतो. याशिवाय, तुम्हाला अमर्यादित कॉलसह दररोज 100 एसएमएस देखील मिळत आहेत. हा प्लान रिचार्ज केल्यानंतर डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईलचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे. प्लानमध्ये, तुम्हाला मोफत हॅलो ट्यूनसह (Hello Tunes) विंक म्युझिक फ्री सदस्यता देखील मिळत आहे.
2999 रुपयांचा रिचार्ज प्लान
एअरटेलच्या या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये अमर्यादित कॉलसह दैनंदिन इंटरनेट वापरासाठी 2GB इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. दुसरीकडे, जर आपण इतर फायद्यांबद्दल सांगितले, तर यामध्ये फ्री हॅलो ट्यून आणि विंक म्युझिक फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळत आहे. तुम्ही एक वर्षाच्या वैधतेसह चांगला रिचार्ज प्लान शोधत असाल तर. अशा परिस्थितीत एअरटेलचे हे प्लान तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात.