Airbag In Old Car: भारतात दरवर्षी तब्बल पाच लाख अपघातांमध्ये किमान दीड लाख लोकांचा जीव जातो. त्यापैकी अनेकजण 65 टक्के 18 ते 34 वयोगटातील आहेत. अशावेळी अलीकडेच उद्योगपती सायरस मिस्त्री (industrialist Cyrus Mistry also died in a road accident) यांचाही रस्ता अपघातात मृत्यू झाला. अहमदाबादहून मुंबईला (Ahmedabad to Mumbai) येताना प्रवासादरम्यान झालेल्या अपघातात सायरस मिस्त्री आणि कारस्वारासह एकूण दोघांचा मृत्यू झाला. अशा अपघातांनंतर गाड्या अधिक सुरक्षित करण्यावर (making cars more safe) भर दिला जात आहे. सरकारही कार अधिक सुरक्षित बनविण्यावर भर देत असून या भागात कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य (six airbags mandatory in cars ) करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशावेळी आपल्याकडे एअरबॅग नसलेली कार असेल आणि तुम्हाला सुरक्षेसाठी तुमच्या कारमध्ये एअरबॅग्ज ठेवायची असतील तर ते शक्य आहे का? तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही या बातमीत देत आहोत.
एअरबॅग अपघातादरम्यान होणाऱ्या जबरदस्त धक्क्यांपासून प्रवाशांची छाती, चेहरा आणि डोके सुरक्षित ठेवते. (airbag protects the chest, face and head of the passengers from the forceful shocks that occur during an accident ) त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होते. सर्वसाधारणपणे त्याचे कार्य डॅशबोर्ड, स्टीयरिंग आणि काचेच्या दरम्यान अशी पॅड केलेली भिंत तयार करते. ज्यामुळे गंभीर दुखापतीचा धोका कमी होतो. त्यामुळे जगभरातील सर्व कार निर्माते त्यांच्या कारमध्ये एअरबॅग्जची पूर्ण तपासणी केल्यानंतर बसवून देतात. यासाठी सर्व कारसाठी एअरबॅग्ज वेगळ्या पद्धतीने तयार केल्या जातात. त्यानंतर कारची क्रॅश चाचणी यशस्वी झाल्यानंतरच कारमध्ये एअरबॅग्ज बसवल्या जातात. अशावेळी बाहेरून एअरबॅग्ज बसवल्या असतील तर अशा परिस्थितीत क्रॅश चाचणी होणे अशक्य आहे. (Danger of getting airbags outside the company) मग एकतर गरजेच्या वेळी एअरबॅग उघडणार नाही आणि गरज नसताना एअरबॅग उघडण्याचीही शक्यता आहे. अशा वेळी बाहेरून एअरबॅग बसवणे अधिक धोकादायक ठरू शकते.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले होते की एअरबॅगची किंमत फक्त 900 रुपयांपर्यंत जाते. (Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari had recently told that the cost of airbags goes up to Rs 900) अशा परिस्थितीत जर बाहेरून एअरबॅग्ज बसवल्या तर यापेक्षा कितीतरी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या कारचे स्टीयरिंग बदलू शकता ज्यामध्ये आधीच एअरबॅग आहे. हा पर्याय फक्त काहीच गाड्यांसह उपलब्ध आहे. गडकरी साहेबांनी यासाठी नुकत्याच सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याच्यासह केलेल्या अनेक जाहिराती शेअर केल्या आहेत. एकूणच लवकरच आता प्रत्येक कारला एअरबॅग बसवण्याचा निर्णय होऊ शकतो. (replace your car’s steering with another one that already has an airbag)