Air Quality : बाब्बो! जगातील ‘या’ 10 देशांत प्रचंड प्रदूषण; पहा, भारताचा नंबर कितवा?

Air Quality : जगभरात आता हवेच्या प्रदूषणाची समस्या विक्राळ (Air Pollution) स्वरूप धारण करू (Air Quality) लागली आहे. IQAir ने प्रकाशित केलेल्या एका अहवालात असे दिसून आले आहे की हवेच्या गुणवत्तेत भारत जगातील (India) दहा देशांमध्ये तिसऱ्या नंबरवर आहे. IQAir ने जगभरातील हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण केले आहे त्यानंतर त्यांनी एक सविस्तर अहवाल तयार केला आहे. या अहवालात जगातील सर्वाधिक दहा प्रदूषित देशांची माहिती (World’s 10 Most Polluted Countries) देण्यात आली आहे. या अहवालानुसार भारतातील 83 शहरे अशी होती जी जागतिक आरोग्य संघटनेच्या हवेच्या (World Health Organization) गुणवत्तेच्या मार्गदर्शक तत्वांपेक्षा दहापट जास्त प्रदूषित होती.

धक्कादायक बाब म्हणजे जगभरातील 7 हजार 800 हून अधिक शहरांपैकी केवळ 9% शहरांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांची पूर्तता केली आहे. त्यांच्या मते वार्षिक सरासरी PM 2.5 पातळी 5 मायक्रोग्रॅमवर क्युबिक मीटर पेक्षा जास्त नसावी. आज आपण अशाच जगातील दहा प्रदूषित देशांची माहिती घेणार आहोत.

बांगलादेश PM 79.9

दक्षिण आशियातील देश बांगलादेशने हवेच्या गुणवत्तेत जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. यामुळे जगातील सर्वात खराब हवेची गुणवत्ता असलेल्या देशांमध्ये बांगलादेश (Bangladesh Pollution) हा प्रथम क्रमांकावर आहे.

Air Quality

World’s Most Polluted City | जगातील सर्वाधिक प्रदुषित शहर भारतात, नाव ऐकून बसेल धक्का!

पाकिस्तान PM 73.7

भारताचा आणखी एक शेजारी देश म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तानमध्येही हवेच्या गुणवत्तेची पातळी अतिशय (Pakistan) खराब झालेली आहे. या देशात प्रचंड हवा प्रदूषण होत आहे. या देशात पीएम पातळी 73.7 मायक्रोग्रम प्रति घनमीटरपर्यंत पोहोचली आहे. जे खराब हवेच्या गुणवत्तेमुळे उद्भवलेल्या आव्हानाचे द्योतक आहे. यावर वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. आज पाकिस्तानमध्ये कराची, लाहोर, रावळपिंडी यांसारखी जी मोठी शहरी आहेत ती सर्वाधिक प्रदूषित म्हणून ओळखली जातात.

भारत PM 54.5

हवेच्या प्रदूषणाच्या बाबतीत भारत जगातील तिसरा देश ठरला आहे. भारतात प्रदूषण प्रचंड वाढत चालले आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता यांसारख्या महानगरांबरोबरच देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी चिंताजनक वाढली आहे. या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. लोकांना अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी त्याचा फारसा फरक दिसून येत नाही. भारत हवेच्या गुणवत्तेची मानके सुधारण्यासाठी सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. देशात प्रदूषणाची पातळी पीएम 54.4 मायक्रोग्रम प्रति घनमीटर इतकी नोंदवण्यात आली आहे.

ताजिकिस्तान PM 49

ताजिकिस्तानमध्ये देखील प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या देशात प्रदूषणाची पातळी PM 49 मायक्रोग्रम प्रति घनमीटरपर्यंत पोहोचली आहे. प्रदूषणाचे हे प्रमाण कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी हवेच्या गुणवत्ता व्यवस्थापन धोरणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Air Quality

Health Insurance । सावधान! हेल्थ इन्शुरन्स क्लेम करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, नाहीतर मिळणार नाही लाभ

बुर्किना फासो PM 46.6

बुर्किना फासो हा देश सध्या प्रदूषणाच्या आव्हानाचा मोठ्या प्रमाणात सामना करत आहे. देशात प्रदूषणाची पातळी 46.6 मायक्रोग्रम प्रति घनमीटर इतकी नोंदवली गेली आहे. बुर्किना फासोला वायू प्रदूषणा संबंधित मोठ्या आरोग्य धोक्यांचा सामना करावा लागत आहे. या गोष्टींकडे वेळीच लक्ष देऊन प्रदूषणाचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी येथील सरकारला आता युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे.

इराक PM 43.8

इराकमध्ये सुद्धा प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. देशात प्रदूषणाचे प्रमाण 43.8 मायक्रोग्रम प्रति घनमीटर इतके नोंदवण्यात आले आहे. प्रदूषणाचा धोका या देशातही वाढत चालला आहे. ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्यांचा धोकाही वाढला आहे. प्रदूषणाचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक निर्णय घेणे गरजेचे बनले आहे.

संयुक्त अरब अमिरात PM 43

संयुक्त अरब अमिरात हा (UAE) देश सध्या वेगाने प्रगती करत आहे. या देशातील मोठमोठ्या शहरात प्रदूषणाचे प्रमाण मात्र लक्षणीयरित्या वाढले आहे. सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी खराब हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण आणि प्रदूषण नियंत्रण उपायांवर त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. या देशात PM पातळी 43 मायक्रोग्रम प्रति घनमीटर इतकी नोंदवली गेली आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत संयुक्त अमिरात या देशाचा सातवा क्रमांक आहे.

Air Quality

नेपाळ PM 42.4

भारताचा आणखी एक शेजारी देश नेपाळ नेपाळ हा नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. परंतु या देशातही आता प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस विक्राळ रूप धारण करू लागली आहे. नेपाळला वायू प्रदूषणाच्या गंभीर आव्हानांचा सामना सध्या करावा लागत आहे. पीएम पातळी 42.4 मायक्रोग्रम घनमीटर पर्यंत जाऊन पोहोचली आहे. या देशातील काठमांडूसारखी मोठी शहरे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. या देशातील सरकार प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Mumbai City : मुंबईचा दबदबा, बीजिंगला पछाडले; पहा, मुंबईत किती आहेत अब्जाधीश?

इजिप्त PM 42.4

आफ्रिका खंडातील एक मोठा देश म्हणून इजिप्त ओळखला जातो. इजिप्तमध्ये सध्या प्रदूषणाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. यामुळे येथील नागरिकांना अनेक आरोग्य आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. देशात PM पातळी 42.4 मायक्रोग्रम प्रति घनमीटरपर्यंत पोहोचली आहे. प्रदूषणाचे स्रोत कमी करण्यासाठी वाढलेले प्रयत्न आणि देशभरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन तसेच उपायोजनावर लवकरात लवकर भर देणे येथील सरकारला आवश्यक आहे. इजिप्तमध्ये पर्यटकांची संख्या मोठी आहे. येथील सरकारला पर्यटनाच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळते. परंतु आता देशात प्रदूषणाची समस्या देखील गंभीर स्वरूप धारण करू लागली आहे त्यामुळे सरकारला या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

डीआर कांगो PM 40.8

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या यादीत आहे. या देशात आता प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. देशात PM पातळी 40.8 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि देशातील वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सरकारला तातडीने काही कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे जेणेकरून प्रदूषणाचे प्रमाण कमी करता येईल. Air Quality

Leave a Comment