Air Pollution in Delhi : नवी दिल्ली : दिल्लीतील वायू प्रदूषणाची धोकादायक (Air Pollution in Delhi) स्थिती असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ही केवळ राजधानीचीच नाही तर संपूर्ण उत्तर भारताची समस्या असल्याचे म्हटले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्यासोबत शुक्रवारी पत्रकार परिषद घेत असताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, ही आरोप-प्रत्यारोपांची वेळ नाही. यावर त्यांनी पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. शेत जमिनीतील पीक काढल्यानंतर राहिलेले सुकलेले गवत जाळण्याच्या घटनांची कबुली देताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, मान सरकारला फक्त सहा महिने झाले आहेत, पुढील वर्षापर्यंत त्यावर नियंत्रण येईल.
केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील हवा खूप खराब झाली आहे, प्रदूषण खूप वाढले आहे. लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. मात्र, त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानपर्यंतच्या अनेक शहरांची नावे सांगितली आणि या शहरांमध्येही हवा दिल्लीसारखीच खराब असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ही समस्या संपूर्ण उत्तर भारताची आहे. याला फक्त आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party), अरविंद केजरीवाल, दिल्ली आणि पंजाब सरकार जबाबदार नाही हे उघड आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, प्रदूषणाची अनेक कारणे आहेत. अनेक स्थानिक आणि प्रादेशिक कारणे आहेत. एका राज्याची हवा एका राज्यात राहत नाही, वारा इकडून तिकडे जातो, तिथून इकडे येतो. संपूर्ण उत्तर भारताला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने पुढे येऊन पावले उचलली पाहिजेत, असे आम्ही अनेकदा सांगितले आहे. केंद्र सरकारला प्रदूषणाच्या घटकांवर काम करावे लागेल, असे ते म्हणाले. संयुक्त बैठक व्हावी, तज्ज्ञांचे मार्गदशर्न घ्यावे. राजकारणाने ते सुटणार नाही, असे ते म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले, केजरीवालांवर टीका करून तोडगा काढता येत असेल तर तसेही करता येईल.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पंजाब सरकारची मात्र पाठराखण केली. ते म्हणाले, की मान सरकारला फक्त सहा महिने झाले आहेत. सुरुवातीचे काही महिने कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करण्यात गेले. पुढील वर्षी असा त्रास होऊ नये, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, अनेक पावले उचलली जात आहेत. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनीही याला सहमती दर्शवली आणि सांगितले की पंजाबचे शेतकरी पीक रोटेशन बदलण्यास तयार आहेत, त्यांना यासाठी मदत केली पाहिजे.
दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की पंजाब आणि दिल्लीत आमचे सरकार आहे. ही वेळ एकमेकांवर टीका करण्याची नाही. अशा संवेदनशील मुद्द्यावर राजकारण नाही. यामुळे प्रश्न सुटणार नाही. याचा फायदा जनतेला होत नाही. आमच्या सरकारला आता सहा महिने झाले आहेत, सहा महिने हा फार कमी कालावधी आहे.
- Read : Delhi Air Pollution: अर्र…दिल्ली सरकारने घेतला हा निर्णय; शाळांना दिले हे निर्देश
- Delhi Air Pollution : प्रदूषणाचा धोका वाढला..! सरकारने लोकांच्या आरोग्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय, जाणून घ्या..