नवी दिल्ली : जसजसा हिवाळा येतो तसतसे भारताच्या मैदानी भागात वायू प्रदूषणाची समस्या गंभीर बनते. जेव्हा वायू प्रदूषणाचा विचार केला जातो तेव्हा लोकांना वाटते की दिल्ली, गाझियाबाद, गुडगाव आणि नोएडा सर्वात वाईट स्थितीत असेल. पण, हा लोकांचा गैरसमज आहे. खरे पाहिले तर बिहारमधील सर्वात लहान शहराच्या वायू प्रदूषणासमोर दिल्लीतील प्रदूषण काहीच नाही, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) जाहीर केलेली आकडेवारी पाहिली तर आश्चर्यचकित व्हाल. यामध्ये अधिक प्रदूषण असलेली शहरे लाल आणि गडद लाल रंगात दाखवण्यात आली आहेत. या रंगाने चिन्हांकित शहरांची नावे पाहिल्यास, तुम्हाला कळेल की देशातील वायू प्रदूषणाचा एक मोठा भाग हा फक्त बिहारमधील शहरांचा आहे. आम्ही ही माहिती नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) कडून मिळवली आहे, जी तुम्ही पुढे देखील पाहू शकता.
NCDC ने सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास CPCB कडून मिळालेला डेटा जाहीर केला. यामध्ये बिहारच्या बेगुसरायमध्ये 379, बक्सरमध्ये 378, छपरामध्ये 316, दरभंगामध्ये 354, कटिहारमध्ये 327, पाटणामध्ये 322, पूर्णियामध्ये 317, सहरसामध्ये 327, समस्तीपूरमध्ये 357 हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला आहे. ही सर्व शहरे रेड झोनमध्ये आहेत.
CPCB च्या या यादीत देशभरातील एकूण 167 शहरांचा डेटा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यापैकी एकूण 13 शहरे रेड झोनमध्ये आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की 13 पैकी नऊ शहरे फक्त बिहारमधील आहेत. या व्यतिरिक्त, देशाची राजधानी दिल्ली व्यतिरिक्त, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एक शहर रेड झोन शहरांमध्ये समाविष्ट आहे. रेड झोन शहरांमध्ये AQI सह दिल्ली 316, जबलपूर 308, पुणे 302, सिंगरौली 301 यांचा समावेश आहे.
बिहारमधील दोन शहरांनी तर रेड झोन पार केला आहे. बेतियामध्ये 469, मोतिहारीमध्ये 410 हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला आहे. ही दोन शहरे देशातील एकमेव शहरे आहेत ज्याचा AQI 400 पेक्षा जास्त आहे. या शहरांतील हवेची गुणवत्ता श्वसनाच्या रुग्णांसाठी अत्यंत घातक ठरू शकते. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार वायू प्रदूषणाचे सहा श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते. 0 ते 50 पर्यंत AQI असलेली शहरे हिरव्या रंगात दाखवली आहेत. हे कमी जोखमीचे क्षेत्र मानले जाते. 51 ते 100 AQI असलेली शहरे हलक्या हिरव्या रंगात दाखवली आहेत. ही परिस्थिती थोडी चिंताजनक आहे. पिवळा रंग जास्त काळजीचे क्षेत्र दर्शवितो. हे 101 ते 200 AQI कव्हर करते. यापेक्षा बिहारच्या सर्वच जिल्हा मुख्यालयांची परिस्थिती गंभीर असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
201 ते 300 एक्यूआय खराब मानले जाते, 301 ते 400 अत्यंत खराब आणि 400 पेक्षा जास्त धोकादायक मानले जाते. बिहारमधील बहुतेक शहरांचा AQI अत्यंत धोकादायक श्रेणीत आहे. वातावरणात धुळीचे मोठे कण असल्याने हे घडत आहे. बांधकाम क्षेत्रातील मानकांकडे दुर्लक्ष करणे, वाळू आणि माती उत्खनन आणि वाहतूक यातील मानकांकडे दुर्लक्ष करणे हे यामागील प्रमुख कारण आहे.
- Read : Delhi Air Pollution: दिल्लीची हवा बनली अधिक विषारी; हवेची गुणवत्ता ‘खूप खराब’, नोएडासह NCR चा AQI जाणून घ्या
- Hack to avoid pollution : प्रदूषण वाढतंय ; टाळण्यासाठी “या “गोष्टी ठेवा लक्षात, होईल फायदाच फायदा