Air Conditioning Side Effects | ‘एसी’ची गार हवा, वाढेल डोक्याचा ताप; सावध व्हा.. ‘हे’ 5 धोके ओळखा

Air Conditioning Side Effects : कडाक्याच्या उन्हाळ्यात बहुतेक घरांमध्ये एसीचा वापर (Air Conditioning Side Effects) सुरू होतो. उष्णतेपासून आराम मिळविण्यासाठी लोक रात्रंदिवस एसी चालू ठेवतात. एसीच्या थंड हवेत आराम वाटतो परंतु हीच एसीची हवा आरोग्यासाठी किती घातक आहे याबाबत एक अहवाल समोर आला आहे. वेबएमडीच्या मते जेव्हा तुम्ही ऑफिस किंवा घरी तासानतास एसी चालवता तेव्हा व्हेंटिलेशनची काळजी घेणे खूप गरजेचे असते. जर योग्य व्हेंटिलेशन नसेल तर एसीमुळे खोकला, सर्दी किंवा अन्य आजारांचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते. यासाठी वेळोवेळी फिल्टर बदलणे, खिडक्या उघडणे आणि ताजी हवा घरात येऊ देणे आवश्यक आहे.

डीहायड्रेशन

जेव्हा तुम्ही तासानतास एसीमध्ये बसता तेव्हा खोलीतील आर्द्रता नाहीशी होऊ लागते. यामुळे त्वचा आणि शरीर वेगाने निर्जलीकरण होऊ लागते. त्यामुळे त्वचा कोरडी होणे आणि शरीरात पाणी कमी झाल्यामुळे चक्कर येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Unhealthy Foods | सावधान..! ज्या पदार्थांना समजताय हेल्दी तेच पाडतील आजारी; वाचा अन् सावध व्हा

Air Conditioning Side Effects

डोळ्यांच्या समस्या

खोली ड्राय झाल्यामुळे डोळ्यांना कोरडे पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे खाज सुटणे, जळजळ होणे, डोळ्यातून वारंवार पाणी येणे अशा समस्या उद्भवू शकतात. इतकेच नाही तर अनेक प्रकारचे इन्फेक्शन होण्याचाही धोका संभवतो.

श्वसनाचा त्रास

संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक दिवसभर एसीमध्ये काम करतात किंवा रात्री एसी चालू करून झोपतात. त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यांना नेहमी नोजल्सचा वापर करावा लागतो. एवढेच नाही तर श्वसनाच्या समस्याही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते.

डोकेदुखी

तुम्हाला एसीमध्ये जास्त सोयीस्कर वाटत असले तरी यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता असते. तुमच्या एसीचा फिल्टर खराब झाला असेल तर ही समस्या वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे एसीचा फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करण्याकडे लक्ष द्या.

Air Conditioning Side Effects

Improve Heart Health : हृदयाचे आरोग्य बिघडतयं? तर मग आजच करा ‘हे’ महत्त्वाचे काम

सहनशीलता कमी होणे

तुम्ही एसीमध्ये जास्त काळ राहिल्यास तुमची उष्णता सहन करण्याची क्षमता कमी होऊ लागते आणि एसी मधून बाहेर पडता तेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते. उन्हाळ्याच्या दिवसात ही समस्या जाणवू लागते.

अॅलर्जीची शक्यता

जर तुमच्या एसीची सर्विसिंग झाली नसेल किंवा तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी संसर्गजन्य जिवाणू असतील तर सेंट्रल एसीमुळे तुम्ही सहजपणे अॅलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते.

Leave a Comment