AIMIM News : विशालगड प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करा, एमआयएमची मागणी

AIMIM News : विशालगड प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची मागणी  एमआयएम अहमदनगर जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी केली आहे. दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात विशालगड येथे काही वर्षापासून अतिक्रमण हटवण्यासाठी काही संघटन आंदोलन  करत आहे. संबंधित गडाला लागत मलीक रेहान दर्गाही खूप जुनी असून त्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांचा कारकिर्दीत मिळत असल्याचे पुरावे आहे.

या दर्ग्याला सर्व धर्माचे लोक मानत असून सर्व धर्माचे भाविक येथे नवस करून फेडण्यासाठी येत असतात. विशालगडा जवळ परिसरात अनेक वर्षापासून नागरीक राहत आहे. काहींनी अतिक्रमण केले असले तरी काहींचे स्वताचे घर आहे. काही दिवसापासून विशालगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी काही संघटना अग्रेसर असल्याने व संबंधित संघटन आंदोलन  करीत असल्याने पालिकेने अतिक्रमण हटवण्याचे निर्णय घेतले असल्याचे समजते.

परंतु अतिक्रम काढण्याचे नावाखाली काही जातीवादी आतंकी संघटनेने जातीय दंगल घडून आणण्याचा प्रयत्न केले असल्याचे चित्र दिसत आहे.या संघटनेने अतिक्रमणच्या नावाखाली गजापूर गावात व इतर परिसरात मुस्लीम समाज,त्यांचे धार्मिक स्थळ , धार्मिक ग्रंथाची विटंबना केली आहे. आणि याचे चित्रीकरण व्हायरल केले. संबंधित संघटनने ज्याप्रकारे मुस्लीम समाजाला,मस्जिदला,धार्मिक ग्रंथाची विटंबना केली.

त्यावरून हे स्पष्ट आहे की या जातीवादी आतंकी संघटनेला सरकारचे पाठबळ असल्याचे दिसते. तसेच हे सर्व आतंक घडत असतांना तेथील पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांची जी बघ्याची भूमिका घेतली त्यावरून हे स्पष्ट दिसत आहे.  त्यामुळे या अधिकारींनी मुस्लीम समाजावर अत्याचार होत आहे हे दिसत होते पण यांनी कोणतीच भूमिका त्यावेळी घेतली नाही.

 या उलट अतिरेक करणाऱ्या आतंकी संघटनेसोबत दिसत आहे. याची चौकशी निष्पक्ष होणे गरजेचे आहे. हे सर्व घटनाक्रम पाहिले तर असे दिसते की मुस्लीम समाजावर अत्याचार करणे त्यांचे धार्मिक स्थळांची विटंबना करणे, त्याचे धार्मिक ग्रंथाची विटंबना करणे, मुस्लीम समाजाचे महिला, लहान मुले यांना बेदम मारून अत्याचार करणे हे सर्व प्रकरण सरकार, जिल्हा व पोलीस प्रशासन यांच्या मदतीने या

आतंकवादी संघटनेने केले असल्याची आरोप एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी केले.

मुख्यमंत्रीना देण्यात आलेले निवेदनात डॉ.परवेज अशरफी यांनी आरोप केले आहे की विशालगड अतिक्रमण मुक्त करण्याच्या नावाखाली या जातीवादी आतंकी संघटनेने जमाव जमा करण्यासाठी आव्हान केले होते. ज्या प्रकारे ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मस्जिद शहीद करण्यात आली. त्याच प्रकारे कोल्हापूर येथे रजा जामा मस्जीद शहीद करून बाबरी मस्जिदची पुर्नावृत्ती करण्याचा षडयंत्र या जातीवादी आतंकी संघटनेचे असल्याचे दिसत आहे. 

तरी दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी एम आय एम ने केली आहे. तसेच ज्या नागरिकांचा नुकसान झाले त्यांचे घर उध्वस्त झाले त्यांचा सरकारने पुनर्वसन करून त्यांना आधार देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Comment