अहमदनगर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारणी निवडीची बैठक आज जिल्हा परिषदेत पार पडली. या बैठकीसाठी जिल्हा परिषद मुख्यालयासह तालुका स्तरावरून संघटनेचे पदाधिकारी, सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये चर्चा करून पदाधिकारी निवड करण्यात आली. यामध्ये सभागृहाच्या एकमताने अभय गट यांची जिल्हाध्यक्ष या पदावर, तर मनोज चोभे यांची सचिव या पदावर निवड करण्यात आली. (ahmednagar jilha parishad union district president abhay gat and secretary manoj chobhe news)
Share Market: त्यामुळे डिमॅट खाती उघडण्याची उडणार तारांबळ..! पहा काय असेल यासाठी कारण https://t.co/7CwzAw2rIA
— Krushirang (@krushirang) April 28, 2022
तसेच वैशाली कासार (सहसचिव), कैलास भडके (कार्याध्यक्ष – मुख्यालय), जालिंदर ढवळे (कार्याध्यक्ष – नगर दक्षिण), प्रविण कु-हे (कार्याध्यक्ष – नगर उत्तर) प्रतिभा घिगे (खजिनदार), नाना हांबर्डे, अर्चना रासकर, कल्पना शिंदे, संतोष लके, भाऊसाहेब आव्हाड, प्रमोद झरेकर यांची युनियनच्या उपाध्यक्षपदासाठी एकमताने निवड झाली आहे. मावळते जिल्हाध्यक्ष विकास साळुंके यांनी त्यांच्या मागील 5 वर्षात केलेल्या कामाचे आढावा सभागृहास दिला. यामध्ये आगावू वेतवाढी, कालबद्ध पदोन्नती, जिल्हा परिषद उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कार, पदोन्नती आणि जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या जिव्हाळ्याचा असलेला विषय बदल्या यामध्ये युनियनने घेतेलेल्या कठोर भुमिकेमुळे कर्मचा-यांच्या मुदतपुर्व प्रशासकिय बदल्यांमुळे कर्मचा-यांची जी गैरसोय होत होती त्याला आळा बसला. यासाठी त्यांना कार्याध्यक्ष – भारत बोरुडे, कैलास भडके, सचिव – किशोर शिंदे, खजिनदार – भारती सांगळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
म्हणून UPL कंपनीने ‘त्या’ गावाला दिला ५० टन झेबा; पहा नेमका काय होतोय याचा शेतीमध्ये उपयोग https://t.co/olxymBTy5u
— Krushirang (@krushirang) April 28, 2022
आजच्या बैठक एम .पी. कचरे, राज्यसमन्वयक यांच्या अध्यक्षतेखाली ही पार पडली. या बैठकीस राज्य उपाध्यक्ष – सुभाष कराळे, राज्य सहसचिव – राजेंद्र म्हस्के, राज्य संपर्क प्रमुख – सचिन कोतकर, केंद्रिय कार्यकारणी सदस्य – शशिकांत रासकर, माजी अध्यक्ष – विजय कोरडे, कवीवर्य – मोहन कडलग, सोमनाथ भिटे, सारंग पठारे, सुमित चव्हाण, योगिराज वारुळे, रजनी जाधव, विजय औटी, कैलास झुंगे, संभाजी जरे, आबासाहेब घोडके, सुहास गोबरे, संगिता बनकर, छाया बांदल, सरला ठोंबरे, शांतिलाल ढोभाळ, यशवंत सालके, चंद्रकांत वाकचौरे, सुनिल जाधव, विनयाक कातारे, संदिप वाघमारे, श्रीकांत ढगे, किशोर वाळुंजकर, नारायण येवेल आणी इतर सभासद कर्मचारी मोठ्या संख्यचे उपस्थित होते.
Coal Power Crisis: मोदी सरकार झालेय हतबल; पहा किती राज्यात आलेय वीजसंकट https://t.co/pVVZI770Ow
— Krushirang (@krushirang) April 26, 2022