Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

वेगळे काहीतरी : नाश्त्यासाठी कमी वेळात तयार करा बटाटा रोल.. ही आहे सोपी रेसिपी..

अहमदनगर – बटाट्याशिवाय (Potato) आपण आपल्या जेवणाची कल्पनाही करू शकत नाही. बटाट्याची भाजी असो किंवा बटाट्यापासून बनवलेल्या विविध प्रकारचे खाद्यपदार्थ असो. प्रत्येक खाद्यपदार्थ स्वादिष्ट असतात. उपवासाच्या खाद्यपदार्थांतही बटाट्याचा समावेश असतो. साबुदाणा खिचडी, बटाटा वेफर्स (Potato Wafers) हे पदार्थ आपण नेहमीच पाहिले आहेत. मात्र, बटाटा रोल (Potato Roll Recipe) हा नवीन पदार्थ आहे. एखाद्या वेळी तुम्हाला जास्त भूक लागली तर तुम्ही बटाटा रोल तयार करू शकता. कारण, हा खाद्यपदार्थ अत्यंत कमी वेळात तयार होतो. आज आम्ही तुम्हाला बटाटा रोल बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

Advertisement

साहित्य – उकडलेले बटाटे 2, पीठ 1 वाटी, चाट मसाला अर्धा चमचा, लाल तिखट 1/4 चमचा, गरम मसाला 1/4 चमचा, हळद 1/4 चमचा, कसुरी मेथी 1 चमचा, तेल आवश्यकतेनुसार, मीठ चवीनुसार.

Advertisement

रेसिपी
बटाट्याचे रोल बनवण्यासाठी प्रथम बटाटे उकळून सोलून घ्या आणि किसून घ्या. आता त्यात लाल तिखट, हळद, चाट मसाला, गरम मसाला, कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. यानंतर दुसऱ्या भांड्यात मैदा घेऊन त्यात थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ मळून घेतल्यानंतर त्याचे गोळे बनवा. आता एक गोळा घेऊन पातळ रोटी तयार करा आणि बटाट्याच्या मिश्रणाचा मसाला रोटीच्या मध्यभागी ठेवा. यानंतर, मसाल्याभोवती कट करताना, रोल फिरवत रहा आणि शेवटी रोलच्या काठावर पाणी लावून चिकटवा. या पद्धतीने सर्व गोळे लाटून त्यांचे रोल तयार करून प्लेटमध्ये बाजूला ठेवा.

Loading...
Advertisement

आता कढई घेऊन त्यात तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात बटाट्याचे रोल टाकून तळून घ्या. रोल 1 ते 2 मिनिटांत चांगले तळून घ्यावेत. त्यांचा रंग सोनेरी होईपर्यंत आणि हे रोल कुरकुरीत होईपर्यंत तळा. आता ते एका प्लेटमध्ये काढा. अशा पद्धतीने टेस्टी पोटॅटो रोल तयार आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरेल.

Advertisement

Todays Recipe : सिमला मिरची बटाटा भाजी आहे एकदम बेस्ट; जाणून घ्या कशी तयार करतात ते..

Advertisement
Advertisement

Leave a Reply