Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Todays Recipe : घरीच तयार करा टेस्टी अन् हेल्दी व्हेजिटेबल खिचडी.. ‘या’ खास पद्धतीने करा तयार..

अहमदनगर – उन्हाळ्याच्या दिवसात नेहमीच हलके आणि पौष्टिक खाद्य पदार्थांचा आहारात समावेश करण्यास सांगितले जाते. अशा परिस्थितीत खिचडीसारखे हलके आणि तितकेच पौष्टिक अन्न दुसरे सापडणार नाही. मूग डाळ-तांदुळाच्या खिचडीत विविध भाज्या मिसळल्या तर या खिचडीची चव आणि दर्जा दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ होते. हलके काही खावेसे वाटेल तेव्हा ही खास व्हेजिटेबल खिचडी (Vegetable Khichadi) हा एक उत्तम पर्याय असू शकतो. हे बनवायला खूप सोपे आहे आणि कमी वेळात तयार होते.

Advertisement

साहित्य – तांदूळ 3/4 वाटी, मूग डाळ 1/3 वाटी, कांदा 1, गाजर 1, वाटाणे अर्धा कप, किसलेला कोबी अर्धा कप, बटाटा 1, फ्लॉवर 4-5 तुकडे, टोमॅटो 1, तूप 2 चमचे, लवंग 4, दालचिनी 1 तुकडा, तमालपत्र 2, कढीपत्ता, लाल तिखट 1/2 चमचा, जिरे 1/2 चमचा, हळद 1/4 चमचा, कोथिंबीर 2 चमचे, काळी मिरी 5 दाणे, तेल 1 चमचा, मीठ चवीनुसार.

Advertisement

रेसिपी

Advertisement

व्हेजिटेबल खिचडी बनवण्यासाठी प्रथम तांदूळ आणि मूग डाळ स्वच्छ करून पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर डाळ आणि तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. आता कांदा, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, बटाटा बारीक करून घ्या. ठरलेल्या वेळेनंतर तांदूळ आणि डाळीचे पाणी काढून टाकावे. आता एक तवा घ्या आणि त्यात तूप टाका आणि मध्यम आचेवर गरम करायला ठेवा.

Loading...
Advertisement

तूप वितळल्यावर त्यात जिरे, दालचिनी, तमालपत्र, काळी मिरी आणि कढीपत्ता टाकून तळून घ्या. यानंतर भाजलेल्या मसाल्यात बारीक केलेला कांदा टाकून तळून घ्या. कांद्याचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता. यानंतर त्यात बारीक केलेल्या भाज्या टाकून दोन ते तीन मिनिटे शिजू द्या. यानंतर कढईत भिजलेले तांदूळ आणि मूग डाळ घालून मिक्स करा. यानंतर लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या. साधारण दोन ते तीन मिनिटांनी गरजेनुसार पाणी टाकून खिचडी मध्यम आचेवर शिजू द्यावी.

Advertisement

खिचडी उकळायला लागल्यावर तवा झाकून गॅस मंद करून 10-15 मिनिटे शिजू द्या. ठरलेल्या वेळेनंतर तव्याचे झाकण काढून खिचडी शिजली आहे की नाही ते पहा. खिचडी शिजली असेल आणि त्यातील सर्व पाणी आटले असेल तर गॅस बंद करा. नाहीतर खिचडी अजून थोडा वेळ शिजू द्यावी. यानंतर स्वादिष्ट व्हेजिटेबल खिचडी तयार आहे.

Advertisement

Todays Recipe : घरच्या घरीच तयार करा टेस्टी पालक खिचडी.. आरोग्यासाठीही आहे फायदेशीर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply