मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अण्णा हजारे करणार आंदोलन; म्हणाले,12 वेळा..
अहमदनगर – समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे. यावेळी ते महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. त्यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा करण्याच्या मागणीसाठी अण्णा हजारे महाराष्ट्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन करणार असून त्याची सुरुवात 9 ऑगस्टपासून होणार आहे.
अण्णा हजारे यांनी यावेळीही मोठे आंदोलन करण्याची रणनीती आखली आहे. अण्णा आपल्या समर्थकांसह महाराष्ट्रातील 35 जिल्हे आणि 200 तालुक्यांमध्ये आंदोलन करणार आहेत. तुम्ही महाराष्ट्रातही लोकायुक्त कायदा करू असे आश्वासन दिले होते, पण मी तुम्हाला 12 वेळा पत्र लिहिले, तरीही तुम्ही उत्तर दिले नाही, असे अण्णा हजारे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे जनतेच्या हितासाठी इच्छा नसतानाही मला आंदोलन करावे लागेल.
महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व्हावा, अशी सरकारची इच्छा नाही
सरकारचे मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असून महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व्हावा, असे सरकारला वाटत नाही, असे अण्णा हजारे म्हणाले. मात्र राज्य पूर्णत: भ्रष्टाचारमुक्त होईपर्यंत माझा लढा सुरूच राहणार आहे. ते म्हणाले की, मी देशाच्या शत्रूंविरुद्ध लढा दिला आहे आणि देशाच्या आत लपलेल्या शत्रूंविरुद्ध लढणार आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
2016 मध्येही अण्णा हजारे यांनी उपोषण केले होते
महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी 2016 मध्ये उपोषणही केले होते. यादरम्यान त्यांनी राळेगणसिद्धीत आठ दिवस उपोषण केले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांचे उपोषण मोडण्यासाठी सर्व अटी मान्य करून लोकायुक्त कायदा करण्यासाठी समिती स्थापन केली होती. मात्र, नंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार आले आणि या प्रकरणी पुढे कोणतीही कारवाई झाली नाही.