Take a fresh look at your lifestyle.

वेगळी काहीतरी : घरच्या घरीच तयार करा टेस्टी बेसन बर्फी; रेसिपीही आहे एकदम सोपी..

अहमदनगर – आपल्याकडे अनेक प्रकारच्या मिठाई तयार केल्या जातात. प्रत्येक राज्यातील खाद्य पदार्थही वेगळे आहेत. या मिठाई आपण सण उत्सव किंवा एखाद्या विशेष प्रसंगी हमखास पाहतो. मिठाई शक्यतो दुकानातून खरेदी करण्याचा ट्रेंड आहे. मात्र, काही वेळेस त्या घरी देखील तयार केल्या जातात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी घरच्या घरी टेस्टी बेसन बर्फी कशी तयार करायची याची खास रेसिपी घेऊन आलो आहोत.

Advertisement

साहित्य – बेसन 500 ग्रॅम, तूप 350 ग्रॅम, हळद (तुम्हाला आवश्यक असल्यास) एक चिमूटभर, वेलची पावडर 1 चमचा, साखर 850 ग्रॅम, पाणी 300 मिली किंवा एक कप आणि मूठभर पिस्ता.

Advertisement

रेसिपी
सर्वात आधी एका कढईत तूप गरम करून त्यात बेसन टाकून ते तपकिरी होईपर्यंत चांगले परतून घ्या. आता थंड होण्यासाठी एका जागी ठेवा. दोन मिनिटांनंतर त्यात हळद, वेलची पावडर टाकून चांगले मिक्स करून घ्या. बेसन थोडे गरम असावे पूर्ण थंड नसावे हे लक्षात घ्या. आता एका पॅनमध्ये पाणी आणि साखर टाका आणि मंद आचेवर गरम करा. काही वेळ शिजू द्या. त्यानंतर गॅस बंद करून दोन मिनिटे थांबा. त्यानंतर बेसनाच्या पिठात हा साखरेचा पाक टाकून चांगले मिसळून घ्या. आता एका ट्रेमध्ये काढून सेट होऊ द्या. नंतर बर्फीच्या आकारात कट करून घ्या. अशा पद्धतीने काही वेळात तुम्ही घरीच बेसनाची बर्फी तयार करू शकता.

Advertisement

वेगळे काहीतरी : घरच्या घरीच तयार करा स्पेशल काजू बर्फी; काही मिनिटात होईल तयार..

Advertisement
Advertisement

Leave a Reply