अहमदनगर – उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने उष्माघाताचा धोका कमी होतो. कारण त्याचा प्रभाव थंड असतो. हे शरीराला उष्णतेपासून संरक्षित करते. तुम्हालाही तुमच्या आहारात कांद्याचा वापर करायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी कांद्याची खास डिश घेऊन आलो आहोत. राजस्थानी आचारी कांदा भाजी ही एक सोपी रेसिपी आहे. वेगळ्या पद्धतीने तयार होणारी ही भाजी तितकीच स्वादिष्टही आहे. ही भाजी कमी वेळात कशी तयार करायची याची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
साहित्य – कांदा अर्धा किलो, हिरवी मिरची, हळद पावडर 1 चमचा, मिरची पावडर 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, मेथी दाणे 1/4 चमचा, बडीशेप अर्धा चमचा, हिंग 1/4 चमचा, पुदिना पाने 1 चमचा, अमचूर पावडर 2 चमचे, तेल 4 चमचे, मीठ चवीनुसार.
रेसिपी
सर्वात आधी कांदा सोलून स्वच्छ धुऊन घ्या. प्रत्येक कांद्याचे 4-6 तुकडे करा. त्यानंतर कढईत तेल गरम करा. त्यात मेथी, बडीशेप आणि टाका. 1 मिनिटानंतर तेलात हिरव्या मिरच्या आणि कांदे टाका. कांदे दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर ठेवा. आता त्यात हळद, मिरची पावडर आणि धने पावडर टाका. कांद्याचा रंग बदलू लागल्यावर हिंग, मीठ टाकून काही वेळ झाकून ठेवा. कांदा पूर्ण शिजल्यावर गॅस कमी करून त्यात पुदिन्याची पाने आणि अमचूर पावडर टाका. त्यानंतर टेस्टी आचारी कांदा भाजी तयार होईल, पराठा किंवा रोटीबरोबर सर्व्ह करा.
Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करा ‘हा’ वेगळा पदार्थ.. रेसिपीही आहे एकदम खास..
Todays Recipe : घरीच तयार करा हॉटेल स्टाइल काजू पनीर मसाला..रेसिपीही आहे एकदम सोपी..