Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Agriculture: ‘त्या’ नियोजनावर भर देण्याचा मंत्र्यांचा सल्ला; पहा नेमक्या काय सूचना दिल्यात कृषी विभागाला

Please wait..

अहमदनगर : येत्‍या खरीप हंगामात शेतक-यांना शेतीसाठी आवश्‍यक असलेले बी-बीयाणे (Seed from private companies), खताचा पुरवठा (Fertilizers) या महत्‍वाच्‍या बाबींचे (agriculture input) नियोजन करून त्‍यांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्‍यावी. तसेच जिल्‍ह्यातील ऊस उत्‍पादकांचा ऊस शिल्‍लक राहता कामा नये. याचेसुध्‍दा नियोजन करावे. यासंदर्भात जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यतेखाली ऊस कारखानदारांच्‍या व्‍यवस्‍थापनासोबत तात्‍काळ बैठक लावावी, अशा सूचनाही राज्‍याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधितांना दिल्‍यात.

Advertisement
Loading...

कृषि निविष्‍ठाबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी तसेच अडचणी सो‍डविण्‍यासाठी व त्‍यांच्‍या तक्रारींचे निवारण करण्‍यासाठी 18002334000 हा टोल फ्री क्रमांक (Toll Free Number for Maharashtra Farmer) व 0241-2353693 हा लँडलाईन क्रमांक (Ahmednagar Agriculture Department Krushi Adhikari Landline Number) देण्‍यात आला आहे. जिल्‍हास्‍तरावरील सन 2022 मधील खरीप हंगाम पूर्व तयारी व नियोजनाबाबत राज्‍याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कृषी विभागाशी संबंधित सर्व यंत्रणांच्‍या कामकाजाचा व तयारीचा आढावा घेतला. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आज यासंदर्भातील बैठकीचे पालकमंत्र्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजन करण्‍यात आले होते. या बैठकीला आमदार लहु कानडे, आमदार आशुतोष काळे, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्‍हा  पोलीस अधिक्षक मनोज पाटील, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्‍हा कृषी अधिक्षक शिवाजीराव जगताप, जिल्‍हा दुय्यम निबंधक दिग्विजय आहेर, कृषी उपसंचालक अंकुश माने, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, विलास नलगे, श्रीरामपूर, सुधाकर बोराळे, संगमनेर, उपसंचालक (आत्‍मा), आर. के. गायकवाड आदी वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते. शेतक-यांना जिल्‍ह्यातील प्रत्‍येक कृषि सेवा केंद्रातील खताचा आजच्‍या तारखेचा साठा कळण्‍यासाठी एक ब्‍लॉग पोस्‍ट तयार करण्‍यात आला आहे. ग्राम कृषि विकास आराखड्याच्‍या माध्‍यमातुन प्रत्‍येक गावाचे खरीप नियोजन करण्‍यात आले आहे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी  यावेळी सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply