Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Agriculture Update: ‘त्यासाठी’ 15 भरारी पथकांची स्थापना; पहा काय नियोजन केलेय कृषी विभागाने

Please wait..

अहमदनगर : जिल्‍ह्यात रासायनिक खतांची (Fertilizers) कमतरता भासणार नाही याचेसुध्‍दा नियोजन करावे. बियाणेसंदर्भात खाजगी कंपनीकडून (Seed from private companies) वेळेत बियाणे शेतक-यांना उपलब्‍ध करून द्यावे. शेतक-यांना गुणवत्‍तापूर्ण निविष्‍ठा (agriculture input)  मिळण्‍यासाठी एकुण 42 गुणवत्‍ता नियंत्रक निरीक्षक कार्यरत असून त्‍यांच्‍या माध्‍यमातुन एकुण 15 भरारी पथकांची स्‍थापना करण्‍यात आली आहे. कृषि निविष्‍ठाबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी तसेच अडचणी सो‍डविण्‍यासाठी व त्‍यांच्‍या तक्रारींचे निवारण करण्‍यासाठी 18002334000 हा टोल फ्री क्रमांक (Toll Free Number for Maharashtra Farmer) व 0241-2353693 हा लँडलाईन क्रमांक (Ahmednagar Agriculture Department Krushi Adhikari Landline Number) देण्‍यात आला आहे.

Advertisement
Loading...

जिल्‍हास्‍तरावरील सन 2022 मधील खरीप हंगाम पूर्व तयारी व नियोजनाबाबत राज्‍याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कृषी विभागाशी संबंधित सर्व यंत्रणांच्‍या कामकाजाचा व तयारीचा आढावा घेतला. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आज यासंदर्भातील बैठकीचे पालकमंत्र्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजन करण्‍यात आले होते. या बैठकीला आमदार लहु कानडे, आमदार आशुतोष काळे, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्‍हा  पोलीस अधिक्षक मनोज पाटील, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्‍हा कृषी अधिक्षक शिवाजीराव जगताप, जिल्‍हा दुय्यम निबंधक दिग्विजय आहेर, कृषी उपसंचालक अंकुश माने, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, विलास नलगे, श्रीरामपूर, सुधाकर बोराळे, संगमनेर, उपसंचालक (आत्‍मा), आर. के. गायकवाड आदी वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते. शेतक-यांना जिल्‍ह्यातील प्रत्‍येक कृषि सेवा केंद्रातील खताचा आजच्‍या तारखेचा साठा कळण्‍यासाठी एक ब्‍लॉग पोस्‍ट तयार करण्‍यात आला आहे. ग्राम कृषि विकास आराखड्याच्‍या माध्‍यमातुन प्रत्‍येक गावाचे खरीप नियोजन करण्‍यात आले आहे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी  यावेळी सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply