Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अॅग्रोव्हिजन ग्रुप व देहरेकरांनी दिली इफ्तार पार्टी; सामाजिक महत्वाची परंपरा जपण्यासाठी गावाची एकी

अहमदनगर : दिवाळी (Diwali) आणि रमजान (Ramjan eid) यासह सर्व सण आणि उत्सव (Festival) एकत्रितपणे साजरा करण्याची भारतीय परंपरा आहे. यासह सर्व जाती आणि धर्माच्या मंडळींनी एकत्रित येऊन यात्रा साजरी करण्याचीही परंपरा देहरे (ता. नगर, जि. अहमदनगर) (Dehre village, Ahmednagar) गावात आहे. या गावात आता इफ्तार पार्टी (Iftar Party) साजरी करण्यात आली.

Advertisement

रमजानच्या पवित्र सणानिमित्त मुस्लीम बांधवाना ग्रामस्थांकडून हे स्नेहभोजन देण्यात आले. सर्वधर्मीय एकोपा आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी अशा परंपरा खूप महत्वाच्या असतात. त्यासाठी अॅग्रोव्हिजन ग्रुपतर्फे देहरे (Agro vision group) गावात इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. संचालक योगेश कटारे, वैभव खांडरे, संकेत कुदळे, योगेश धसाळ, लोकनेते आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे नितीन भांबळ, सुहास पाखरे, प्रतिक तनपुरे, श्रीधर सोनवणे, आदींनी शुक्रवारी (दि. २९ मार्च २०२२) याचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हाजी साजितभाई शेख यांनी आभार मानले आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली.

Loading...
Advertisement

यावेळी हाजी हबिबभाई शेख सर, पत्रकार नबाबभाई शेख, माजी सरपंच अब्दुलभाई शेठ खान, मेजर वसिमभाई शेख, आतिकभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते साहिलभाई शेख, जुनेदभाई खान, इलियास भाई सय्यद, फिरोज भाई शेख, इरफानभाई शेख, जुनेदभाई शेख, जावेदभाई शेख, ठेकेदार शोएबभाई सय्यद, अफजरभाई शेख, फारुखभाई शेख आदि उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply