Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Recipe : घरच्या घरीच तयार करा हॉटेल स्टाइल व्हेज कोफ्ता.. रेसिपीही आहे एकदम खास..

अहमदनगर : रोजच्या आहारात एक सारख्या भाज्या करण्याचा कंटाळा आला असेल तर काहीतरी नवीन तयार करून पहा. आज आम्ही खास तुमच्यासाठी व्हेज कोफ्ते तयार करण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. व्हेज कोफ्ता स्वादिष्ट रेसिपी आहे. व्हेज कोफ्ते तयार करण्यासाठी काही वेळ लागेल मात्र ही रेसिपी एक वेगळा अनुभव नक्कीच ठरेल.

Advertisement

कोफ्ते तयार करण्यासाठी साहित्य
1 बारीक केलेला कांदा, अर्धा कप बारीक केलेला कोबी, अर्धा कप बारीक केलेला फ्लॉवर, अर्धा कप बारीक केलेले गाजर, 2 बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या, थोडे अद्रक, अर्धा कप बेसन, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, 2 चमचे कोथिंबीर, तेल.

Advertisement

कोफ्ता ग्रेवीसाठी साहित्य
2 बारीक केलेले कांदे, 2 बारीक केलेले टोमॅटो, थोडे अद्रक, 2 चमचे तेल, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा सब्जी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, चिमूटभर हिंग, 1 चमचा जिरे, 1 लाल मिरची.

Loading...
Advertisement

रेसिपी
कोफ्ता तयार करण्यासाठी सर्व प्रथम भाज्या पाण्याने धुऊन घ्या. एकतर बारीक करुन घ्या किंवा कांदे, कोबी, गाजर इत्यादी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. भाज्यांमधील अतिरिक्त पाणी काढून टाका. आता एक वाटी घेऊन त्यात बेसन टाका. 1 चमचा तेल आणि त्यानंतर भाज्या टाका. आता त्यात मिरची, धनेपूड, चाट मसाला, जिरेपूड, लिंबाचा रस टाकून मिक्स करा. या मिश्रणात मीठ टाकून कोफ्त्याचे गोळे बनवा. आता कढई गॅसवर ठेवा. कोफ्त्याचे गोळे तळण्यासाठी त्यात तेल टाका. त्यात कोफ्ते तळून घ्या. सर्व कोफ्ते तळल्यानंतर बाजूला ठेवा. आता कढईत 2 चमचे तेल टाका आणि त्यात चिमूटभर हिंग, 1 चमचा जिरे आणि लाल मिरच्या टाकून तडतडू द्या.

Advertisement

त्यानंतर त्यात कांदा टाकून परता. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्यात बारीक केलेले टोमॅटो टाका. आता हळद, लाल तिखट टाकून ग्रेव्ही शिजू द्या. त्यात चाट मसाला, धनेपूड आणि मीठ टाका. थोडा वेळ शिजल्यानंतर त्यात गरम मसाला मिसळा. आता त्यात कोफ्ते आणि बारीक केलेली कोथिंबीर टाका. अशा पद्धतीने टेस्टी व्हेज कोफ्ते तयार होतात. भात, रोटी किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.

Advertisement

Recipe : ‘अशा’ पद्धतीने तयार करा हॉटेल स्टाइल मलाई कोफ्ता.. रेसिपीही आहे एकदम खास

Advertisement
Advertisement

Leave a Reply