Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Recipe : उन्हाळ्यात घरीच तयार करा दही कांद्याची भाजी.. चवही होईल अप्रतिम..

अहमदनगर : उन्हाळ्यात दही कांद्याची भाजी खाणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. दही आणि कांदा या दोन्हींचा प्रभाव थंड असतो. उन्हाळ्यात शरीर निरोगी राहावे यासाठी आपण सर्वजण रोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दही खातो. जर तुम्हाला नेहमीच्या भाज्यांचा कंटाळा आला असेल तर यावेळी तुम्ही दही कांद्याची भाजी तयार करून पाहू शकता. हे बनवायला सोपे आहे आणि ही रेसिपी तितकीच स्वादीष्टही आहे. विशेष म्हणजे, कांद्याशिवाय इतर कोणत्याही भाजीची गरज नाही. बरेचदा असे घडते की घरात बनवायला भाजीच उरली नाही. अशा परिस्थितीत दही कांदा भाजी देखील करता येते. ते लगेच तयार होते. चला तर मग जाणून घेऊ या, ही सोपी रेसिपी.

Advertisement

साहित्य – दही 250 ग्रॅम, कांदा 1, जिरे अर्धा चमचा, धने पावडर 1 चमचा, कसुरी मेथी 1/4 चमचा, हिरव्या मिरच्या 4 हळद 1/4 चमचा, गरम मसाला 1/4 चमचा, मीठ चवीनुसार.

Advertisement

रेसिपी
दही आणि कांद्याचे भाजी बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात दही ठेवा आणि घुसळून घ्या. यानंतर एका कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाकून फोडणी द्या. याआधी कांद्याचे तुकडे करून ठेवा. जिरे तडतडायला लागल्यानंतर त्यात कांदा टाकून 2 ते 3 मिनिटे परता. कांद्याचा रंग तपकिरी झाल्यावर त्यात बारीक केलेली हिरवी मिरची टाकून परतून घ्या.

Loading...
Advertisement

एक मिनिटानंतर कांद्याच्या मिश्रणात दही टाकून 5-6 मिनिटे शिजू द्या. यानंतर त्यात हळद, धनेपूड आणि चवीनुसार मीठ टाकून भाजीत चांगले मिसळा. यानंतर भाजीमध्ये गरम मसाला आणि कसुरी मेथी टाकून मिक्स करा. थोड्या वेळानंतर गॅस बंद करा. अशा प्रकारे तुमची स्वादिष्ट दही कांदा भाजी तयार आहे. रोटी किंवा भातासोबत सर्व्ह करा.

Advertisement

वेगळे काहीतरी : ‘अशा’ पद्धतीने बनवा स्पेशळ डाळ ढोकळी; चवही होईल अप्रतिम..

Advertisement
Advertisement

Leave a Reply