Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Recipe : नाश्त्यासाठी कमी वेळात तयार करा टेस्टी ब्रेड रोल; ही आहे सोपी रेसिपी..

अहमदनगर – ब्रेड रोल ही अशी एक फूड रेसिपी आहे जी दिवसाच्या कोणत्याही वेळी बनवता येऊ शकते. हे चवीला अप्रतिम आहे आणि बनवायलाही सोपे आहे. अनेक तळलेल्या खाद्य पदार्थांमध्ये ब्रेड वापरले जाते. याशिवाय ब्रेडपासूनच अनेक प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ बनवले जातात. या स्वादिष्ट खाद्यपदार्थांपैकी एक म्हणजे ब्रेड रोल. ब्रेड रोल तुम्ही नाश्त्यासाठी किंवा थोडी भूक लागल्यानंतर तयार करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी घरी करून पहायची असेल, तर तुम्ही आम्ही दिलेल्या पद्धतीनुसार सहज बनवू शकता.

Advertisement

साहित्य- ब्रेडचे तुकडे 6, उकडलेले बटाटे 3, बारीक केलेला कांदा 1, मका 3 चमचे, मटार 3 चमचे, अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा, लाल तिखट 1/2 चमचा, हिरवी मिरची 1, हळद 1/4 चमचा, गरम मसाला 1/2 चमचा, कोथिंबीर 2 चमचे, आमचूर पावडर 1/2 चमचा, किसलेले पनीर 3 चमचे, तेल, मीठ चवीनुसार.

Advertisement

रेसिपी

Loading...
Advertisement

ब्रेड रोल बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा बारीक करुन घ्या. आता एका कढईत ३ चमचे तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात कांदा घालून त्याचा रंग हलका सोनेरी होईपर्यंत परता. यानंतर कांद्यामध्ये अद्रक-लसूण पेस्ट, लाल तिखट टाकून मिक्स करा. यानंतर स्वीट कॉर्न (मका) आणि मटार घालून तळून घ्या. मका आणि मटार मऊ होईपर्यंत तळा. आता या मिश्रणात मॅश केलेले उकडलेले बटाटे टाका. ते चांगले मिसळून घ्या. यानंतर मिश्रणात हळद, गरम मसाला, अमचूर पावडर, मीठ आणि इतर मसाले घालून चांगले शिजू द्या. यानंतर किसलेले चीज आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा. एक मिनिट शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

Advertisement

आता ब्रेडचे तुकडे घ्या आणि त्यांच्या कडा कट करुन घ्या. आता एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्या. यानंतर ब्रेडचे तुकडे त्यात एक सेकंद टाका आणि नंतर जास्तीचे पाणी गाळून घ्या. आता ब्रेडच्या स्लाइसवर सारण पसरवा. त्यानंतर ब्रेड लाटून घ्या. त्याचप्रमाणे सर्व ब्रेड रोल तयार करा. आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात ब्रेड रोल्स तळून घ्या. सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. यानंतर एका प्लेटमध्ये ब्रेड रोल्स वेगळे काढून ठेवा. याप्रमाणे सर्व ब्रेड रोल तळून घ्या. तुमचा स्वादिष्ट ब्रेड रोल तयार आहे. चटणीबरोबर सर्व्ह करा.

Advertisement

नाश्त्यासाठी घरी तयार करा टेस्टी पनीर ब्रेड रोल.. रेसिपी आहे अगदी सोपी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply