Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

RTE शाळा प्रवेशासाठी मुदतवाढ.. जाणून घ्या, आता कधीपर्यंत घेता येईल शाळेत प्रवेश..

अहमदनगर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खाजगी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा नगर जिल्ह्यातील जवळपास 400 शाळा (School) पात्र ठरल्या आहेत. या शाळांतील एकूण प्रवेश क्षमतेच्या 25 टक्के म्हणजे 3058 जागांवर मोफत प्रवेश (Free Admission) देण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 2924 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. प्रवेश घेण्यासाठी आधी 20 एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. मात्र या मुदतीत निम्मे सुद्धा प्रवेश झाले नाहीत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी पालकांकडून केली जात होती. त्यानंतर प्रवेश घेण्यासाठी 29 एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यानुसार आता या वाढीव मुदतीत विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमध्ये प्रवेश घ्यायचे आहेत.

Advertisement

याआधी शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात 2924 विद्यार्थ्यांची निवड केली होती. शाळा प्रवेशासाठी पालकांना एसएमएस पाठवले होते. प्रवेशासाठी २० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र या मुदतीत निम्मेही प्रवेश घेतले गेले नाहीत. त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी आणखी मुदत मिळावी, अशी मागणी पालक वर्गातून केली जात होती. त्यानुसार आता या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे. 29 एप्रिलपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे. प्रवेश मोफत असतानाही प्रवेशासाठी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली. आता या मुदतीत किती प्रवेश होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Loading...
Advertisement

सध्या जिल्ह्यात प्रवेशासाठी एकूण 400 शाळा पात्र ठरल्या आहेत. या शाळेत एकूण 3058 जागांवर आरटीईअंतर्गत प्रवेश होणार आहेत. यासाठी एकूण प्राप्त 6923 अर्ज मिळाले होती. त्यातील 2924 विद्यार्थ्यांची निवड शिक्षण विभागाने केली आहे. या विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत प्रवेश घेण्यासाठी आता 29 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Advertisement

शाळांकडून फीसाठी पालकांकडे तगादा; पहा कायदा काय सांगतो?

Advertisement
Advertisement

Leave a Reply