Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

काळ भैरवनाथांचा रविवारी आगडगावला यात्रोत्सव

अहमदनगर ः आगडगाव (ता. नगर) येथील काळ भैरवनाथांचा यात्रोत्सव रविवारी (ता. २४) होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध कार्यक्रमांबरोबरच सोमवारी (ता. २५) कुस्त्यांचा जंगी हंगामा रंगणार आहे. रविवारी पहाटे तीन वाजता नाथांच्या मूर्तीला अभिषेक होईल. सकाळची आरती ६.४५ वाजता होईल. सकाळी ७.३० वाजता कावडीधारकांची मिरवणूक व नाथांना जलाभिषेक, त्यानंतर महापूजा, शेरणी वाटप, दुपारी १२ वाजता नैवेद्य महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी मानाच्या काठ्यांची मिरवणूक, छबिना मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम असे कार्यक्रम होणार आहेत.

Loading...
Advertisement

दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता कुस्त्यांचा हंगामा होणार आहे. यात्रोत्सवात दर्शनरांग, पार्किंग व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. भाविकांना पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना नगरहून येण्यासाठी एसटी महामंडळाकडून खास जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. माळीवाडा बसस्थानकातून या बस सुटतील. तसेच देवस्थानच्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी आहेत. हगाम्यासाठी जिल्हाभरातून मल्ल उपस्थित राहणार आहेत. चांगली बिदागी दिली जात असल्याने आगडगावचा हगामा पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच मच्छिंद्र कराळे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बलभीम कराळे केले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply