अहमदनगर: कोणती भाजी बनवायची हे समजत नाही तेव्हा आपण बटाट्याचा विचार करतो. बटाटा ही एक अशी भाजी आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. बटाट्याची भाजी अनेक प्रकारे तयार केली जाते. आपण नेहमीच्या पद्धतीने तयार केलेली बटाट्याची भाजी तर पाहतो. मात्र, असे अनेक प्रकार आहेत ज्याद्वारे बटाटा भाजी तयार करता येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका वेगळ्या पद्धतीच्या बटाट्याची भाजीची रेसिपी सांगणार आहोत. ही एक सोपी रेसिपी आहे जी तुम्ही कधीही तयार करू शकता. येथे आम्ही तुम्हाला खास पद्धतीने जिरा बटाटा कसा बनवायचा ते शिकवणार आहोत.
साहित्य – बटाटा 2, जिरे, तेल 2 चमचे, मीठ चवीनुसार, कोथिंबीर 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, हिंग चिमूटभर.
रेसिपी
प्रथम बटाटे उकडून घ्या. नंतर चौकोनी तुकडे करा. आता एका नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल गरम करा, त्यात जिरे आणि मीठ टाका आणि मिसळून घ्या. जिऱ्याचा रंग बदलेपर्यंत तळा. जिरेपूड, तिखट आणि हिंग घालून चांगले मिसळून घ्या. त्यानंतर साधारण दोन मिनिटे परतून घ्या. बटाटे आणि कोथिंबीर घालून मिक्स करून दोन ते तीन मिनिटे शिजू द्या. त्यानंतर साधे आणि टेस्टी जिरा बटाटा रेसिपी तयार आहे. रोटी किंवा पराठाबरोबर गरमागरम सर्व्ह करा.
आजची रेसिपी : बटाटा-टोमॅटो झोल भाजी कधी खाल्लीय का? नसेल तर बनवा सोप्या पद्धतीने
Recipe : अशा पद्धतीने बनवा टेस्टी अन् हेल्दी बटाटा-पालक; पहा, काय आहे सोपी रेसिपी