अहमदनगर : आपल्याला रोज एक सारखे खाद्य पदार्थ नको असतील आणि नवीन काहीतरी तयार करावेसे वाटत असेल तर मूग डाळीची कचोरी चांगला पर्याय आहे. काहीतरी स्पेशल तयार करावेसे वाटत असेल आणि बाहेरचे खाद्य पदार्थ टाळायचे असतील, तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मूग डाळ कचोरीची रेसिपी. चला तर मग जाणून घेऊ या, काय आहे मूग डाळ कचोरीची रेसिपी.
साहित्य – 2-3 तास भिजलेली मूग डाळ 1 कप, तूप 2 चमचे, अद्रक, बारीक केलेली बडीशोप 2 चमचे, धने 2 चमचे, हिरवी मिरची 2 ते 3, हळद 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, मीठ चवीनुसार, अमचूर पावडर 1 चमचा, पीठी साखर 1 चमचा, कोथिंबीर 1 चमचा, लिंबाचा रस 2 चमचे, मैद्यापासून तयार केलेले कचोरी पीठ 1 1/2 कप, तळण्यासाठी तेल.
रेसिपी
एका नॉन-स्टिक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात अद्रक, बडीशेप, धने, हिरवी मिरची टाकून 1 मिनिट परतून घ्या. नंतर त्यात हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड टाकून मिसळून घ्या. मूग डाळ, मीठ, अमचूर पावडर, पिठी साखर, कोथिंबीर टाकून मिक्स करा. 1-2 मिनिटे शिजू द्या. त्यात लिंबाचा रस टाका, नीट मिसळून घ्या.
आता हे मिश्रण एका भांड्यात घाला, बारीक करा. एका भांड्यात काढून घ्या. कचोरी बनवण्यासाठी पीठ घ्या आणि त्याचा गोळा तयार करा. तयार मिश्रण त्यामध्ये टाकून पीठ दाबून, कडा बंद करा. त्याचा हलका गोळा बनवा आणि थोडा सपाट करा. कढईत आवश्यक तेल गरम करा, तयार कचोऱ्या मध्यम आचेवर सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. अशा पद्धतीने तुम्ही मूग डाळ कचोरी घरच्या घरी तयार करू शकता.
Recipe : सकाळच्या नाश्त्यात बनवा काहीतरी टेस्टी.. घरीच तयार करा मसालेदार कांदा कचोरी..