Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘माहेलकाकार’ अशोकराजे निंबाळकर यांना साहित्य गौरव पुरस्कार

Please wait..

अहमदनगर : सकाळ वृत्तपत्राच्या अहमदनगर आवृत्तीमधील वरिष्ठ उपसंपादक आणि सुप्रसिद्ध लेखक अशोकराजे निंबाळकर यांच्या माहेलका (Mahelka ashok nimbalkar) या कादंबरीला यंदाचा शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे राज्य साहित्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ऐतिहासिक विषयाची सुरेख मांडणी करताना निंबाळकर यांनी प्रेम आणि राजकारण यामधील भावभावना मांडण्याचा वेगळा शैलीदार प्रयत्न यामध्ये केला आहे. स्टोरीटेल या अॉडिओ अॅप्लिकेशनसह प्रिंट स्वरुपात वाचकांना ही कादंबरी उपलब्ध आहे. देशभरातून दखलपात्र ठरलेल्या या कादंबरीच्या लेखनासाठी निंबाळकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

प्रसिद्धी पत्रकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश दादा मुळे यांनी याबाबत म्हटले आहे की, बहुजन समाजासाठी अविरतपणे परिश्रम घेऊन सामाजिक, राजकीय, उद्योग, सहकार, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी क्षेत्रात कार्य करून  तळागाळापर्यंत ज्ञानगंगा घेऊन जाणारे शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे तथा आबा यांच्या नावाने राज्य साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतात. स्मृतीदिनाच्या निमित्ताने हे साहित्य पुरस्कार दरवर्षी 21 एप्रिल रोजी प्रदान करण्यात येणार आहेत. संस्थेचे सचिव प्राचार्य एम.एम. तांबे व उपाध्यक्ष दत्ता पाटील नारळे यांनी या कार्यक्रमास साहित्यिक आणि साहित्य रसिकांनी  उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. खजिनदार बी.के पाडळकर. प्रा. लालचंद हराळ, डॉ. महेश मुळे, सौ मीनाताई पोटे.  सुनील म्हस्के. नीलिम काळदाते. सुधाकर सुंबे पुरस्कार निवड समिती सदस्य साहित्यिका प्रा. मेधाताई काळे. प्रा. डॉ.  बापू चंदनशिवे यावेळी  उपस्थित होते. शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे साहित्य गौरव पुरस्कार 2021 आणि 2022 सालाचा निकाल पुढीलप्रमाणे :-

Advertisement
  • सत्यशोधकीय नियतकालिके : लेखक डॉ. अरुण शिंदे (कोल्हापूर- संशोधन)
  • माझ्या ह्यातीचा दाखला : कवी विशाल इंगोले (लोणार बुलढाणा- कवितासंग्रह)
  • शिरवळ : लेखक हरिश्चंद्र पाटील (सोलापूर- कथासंग्रह)
  • फिरत्या चाकावरती : प्रा .डॉ बाबुराव उपाध्ये (श्रीरामपूर – आत्मकथन)
  • जीवनाचा उपासक : लेखक इंद्रजित पाटील (सोलापूर- चरित्र)
  • नीलमोहर कवयित्री : सौ. जयश्री वाघ (नाशिक- कवितासंग्रह)
  • कुचंबना : लेखक विशाल मोहोड (अमरावती- कथासंग्रह )
  • गाव कवेत घेताना : लेखक विजयकुमार मिठे (नाशिक- ललित)
  • माहेलका : लेखक अशोक निंबाळकर (कर्जत- कादंबरी) Mahelka S01E01 – Audiobook & E-book – Ashok Nimbalkar – Storytel

Advertisement
Advertisement

Leave a Reply