Take a fresh look at your lifestyle.

वेगळे काहीतरी : ‘अशा’ पद्धतीने बनवा स्पेशळ डाळ ढोकळी; चवही होईल अप्रतिम..

अहमदनगर : अनेकांना रोजच्या आहारात नवनवीन खाद्यपदार्थ करणे आवडते. एकाच गोष्टीपासून विविध प्रकारचे पदार्थ बनवता येतात. अशा कडधान्यांपासून अनेक खाद्य पदार्थ तयार करता येतात. तूर डाळीपासून डाळ ढोकळी बनवू शकता. डाळ ढोकळी बनवायला सोपी आणि एकदम स्वादिष्ट आहे. गुजरातमध्ये डाळ ढोकळी विशेष लोकप्रिय आहे. आज आम्ही तुम्हाला ही टेस्टी डाळ ढोकळी कशी तयार करायची, याची रेसिपी सांगणार आहे. या रेसिपीमुळे तुम्ही सुद्धा डाळ ढोकळी तयार करू शकता.

Advertisement

साहित्य- 1 कप तूर डाळ, 2 चमचे शेंगादाणे, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 1 लाल मिरची, कढीपत्ता पाने 5 ते 6, 1 बारीक केलेला कांदा, 1 बारीक केलेला टोमॅटो, 1 चमचा अद्रक-लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, गूळ, चवीनुसार मीठ, 1 चमचा लिंबाचा रस, कोथिंबीर,

Advertisement

ढोकळीसाठी साहित्य
1 कप गव्हाचे पीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा ओवा, तेल, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद.

Advertisement

रेसिपी
डाळ बनवण्यासाठी प्रथम तूरडाळ दोन ते तीन वेळा पाण्याने धुऊन घ्या. यानंतर कुकरमध्ये 1 वाटी डाळ आणि 2 वाट्या पाणी, शेंगादाणे आणि 1 चमचे तेल टाकून 3-4 शिट्ट्या घ्या. डाळ मॅश करा. आता एका कढईत एक चमचा तूप, एक चिमूट हिंग, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 संपूर्ण लाल मिरची आणि 5-6 कढीपत्ता पाने टाकून तळून घ्या. आता त्यात बारीक केलेला कांदा परतून घ्या. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्यात बारीक केलेला टोमॅटो आणि अद्रक-लसूण पेस्ट टालून परतून घ्या. त्यात उकडलेली डाळ टाका, 1 कप पाणी टाका आणि चांगले मिसळा. डाळ मिक्स केल्यानंतर त्यात हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला टाका. नीट ढवळून त्यात गूळ, मीठ आणि 1 चमचा लिंबाचा रस टाका. डाळ पुन्हा उकळा.

Advertisement

ढोकळी बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात 1 वाटी गव्हाचे पीठ, हळद, तिखट, ओवा, मीठ आणि 2 चमचे तेल टाका. मसाले मिक्स केल्यानंतर पीठ मळून घ्या. पीठ खूप घट्ट मळू नका. आता पिठाचे गोळे बनवा. हव्या त्या आकारात लाटून घ्या. आता उकळत्या डाळीत ढोकळीचे तुकडे टाकून चांगले मिक्स करा. त्यानंतर झाकण ठेऊन 10-15 मिनिटे शिजू द्या. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. रोटी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.

Advertisement

नवीन वर्षासाठी काहीतरी स्पेशल..! ‘या’ दोन डिश आहेत अगदीच खास; जाणून घ्या, सोपी रेसिपी

Advertisement
Advertisement

Leave a Reply